हायलाइट्स:
- बिग बॉस १५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सहा आठवडे चालणार
- ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार ही व्यक्ती
- बिग बॉस १५ कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांमध्ये आतुरता
ओटीटी बिग बॉस १५ चे सूत्रसंचालन करण जोहर करणार
बिग बॉसची लोकप्रियता लक्षात घेऊन निर्मात्यांनी यामध्ये काही बदल केले आहेत. बिग बॉस १५ हा कार्यक्रम आता तीन महिन्यांऐवजी सहा महिने चालणार आहे. तसेच हा कार्यक्रम सहा आठवडे ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित केला जाणार आहे. तसेच या कार्यक्रमात सेलिब्रिटींसोबतच सर्वसामान्य प्रेक्षकांनाही सहभागी होता येणार आहे. सहा आठवडे बिग बॉस १५ कार्यक्रम ओटीटीवरून प्रसारित केला जाणार आहे. ओटीटीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची धुरा सलमान खान ऐवजी करण जोहरकडे सोपवण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी करण उत्सुक
ओटीटीवरून प्रसारित होणाऱ्या बिग बॉस १५ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी करण जोहर अतिशय उत्सुक आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘मला आणि माझ्या आईला बिग बॉस हा कार्यक्रम प्रचंड आवडतो. एकही दिवस हा कार्यक्रम आम्ही चुकवत नाही. या कार्यक्रमात असलेल्या ड्रामेबाजीमुळे प्रेक्षक म्हणून माझे देखील खूप मनोरंजन होते. या कार्यक्रमाच्या ओटीटीसाठी सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली आहे. त्यामुळे मी आनंदीत आहे आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.’
करण पुढे म्हणाला, ‘बिग बॉस १५ मध्ये देखील नेहमीसारखा ड्रामा असणार आहे. मी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना प्रेक्षकांना आणि माझ्या मित्रमंडळींना माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन. या कार्यक्रमातील स्पर्धकांमुळे माझा विकेंड मस्त, मजेत जाणार आहे. तुमच्याप्रमाणेच मी देखील या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत आहे.’