हायलाइट्स:
- बिग बॉस १५ कार्यक्रमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
- बिग बॉस १५ कार्यक्रमाच्या घरात सहभागी होणार हे स्पर्धक
- स्पर्धकांच्या सहभागाबाबत निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा नाही
अर्जुन बिजलानी
‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये सहभागी झालेला अर्जुन बिजलानी बिग बॉस १५ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुनने बिग बॉस १५ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यास होकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी ‘बालिका वधू’ मुळे प्रसिद्ध झालेली नेहा मार्दानेदेखील ‘बिग बॉस १५’मध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.
नेहा मार्दा
काही दिवसांपूर्वी नेहा मार्दाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘बिग बॉस १५’ने तिच्याशी संपर्क साधला होता. आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिने या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. अर्जुन आणि नेहा यांच्याशिवाय या कार्यक्रमात सना मकबूल, करण नाथ, रिद्धिमा पंडित हे देखील स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत.
सना मकबूल
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,’खतरों के खिलाडी ११’ मध्ये दिसलेली सना मकबूलने देखील बिग बॉस १५ कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये तिने ‘बिग बॉस १५’ मध्ये सहभागी होण्याची आलेली ऑफर स्वीकारल्याचे सांगितले आहे.
रिद्धिमा पंडित
ई-टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रिद्धिमा पंडितने देखील सलमान खानच्या ‘बिग बॉस १५’मध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. याशिवाय अभिनेता करण नाथचे देखील बिग बॉस १५ मध्ये सहभागी होणे जवळपास निश्चित आहे.
करण नाथ
‘ये दिल है आशिकाना’ या सिनेमात करण नाथ दिसला आहे. करण हा निर्माता राकेश नाथ यांचा मुलगा आहे. दरम्यान, ‘बिग बॉस १५’ च्या घरात नवीन चेहरे दिसणार आहेत. आता आणखी कोणकोण कलाकार यात सहभागी होणार आहेत हे ही लवकरच समजेल.
सहा आठवड्यांच्या आधी वूटवर दिसणार कार्यक्रम
दरम्यान, ‘बिग बॉस १५’ कार्यक्रम टीव्हीवर सर्वप्रथम वूट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून ‘बिग बॉस ओटीटी’ या नावाने प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्माता-दिग्दर्शक करण जोहर करणार आहे. त्यानंतर सहा आठवड्यांनी हा कार्यक्रम टीव्हीवर दाखवला जाईल. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी होणाऱ्या कलाकरांमध्ये निया शर्मा, करण वाही, करण पटेल, मोहनिसा खान, अविनेश रेखी, दिव्या अग्रवाल, सुरभी चंदना, वरुण सूद यांच्या नावांची चर्चा आहे.