हायलाइट्स:
- बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांचा विभक्त होण्याचा निर्णय
- २७ वर्षांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणण्याचा निर्णय
- बिल गेट्स यांची ट्विटरवर माहिती; दोघांचेही संयुक्त निवेदन जारी
बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. नाते टिकवण्याबाबत दीर्घ काळ केलेल्या चर्चेनंतर आम्ही आमची वैवाहिक जीवन संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २७ वर्षात आम्ही पालक असल्याची जबाबदारी निभावली. आम्ही एका फाउंडेशनची स्थापनीा केली. त्याद्वारे जगभरातील लोकांचे आरोग्य आणि त्यांना चांगले आयुष्य मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
वाचा: चीनमुळे जगाला टेन्शन; अवकाशात पाठवलेल्या रॉकेटवरील नियंत्रण सुटले
वाचा:फायजरची भारताला ७ कोटी डॉलरची मदत; लशीबाबत सरकारसोबत चर्चा सुरू
वाचा: करोनाच्या थैमानातून जगाची सुटका नाहीच? नव्या संशोधनात झाला खुलासा
आम्ही सामान्यजणांनासाठी घेतलेले व्रत यापुढेही सुरूच ठेवणार आहोत. मात्र, पती-पत्नी म्हणून असलेले नाते संपुष्टात आणत आहोत. आम्ही नव्या आयुष्याला सुरुवात करत असून आमच्या कुटुंबीयांमधील खासगीपणा जपला जाईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बिल गेट्स आणि मेलिंडा यांचा विवाह १९९४ मध्ये झाला होता. या दोघांची पहिली भेट १९८७ मध्ये झाली होती. २७ वर्षाच्या वैवाहिक आयुष्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.