हायलाइट्स:
- सिद्धार्थ शुक्ला ‘ब्रोकन बट ब्यूटिफुल ३’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- सिद्धार्थ शुक्लाचा ‘ब्रोकन बट ब्यूटिफुल ३’ होतोय सोशल मीडियावर ट्रेंड
- सिद्धार्थ शुक्लासोबत रोमान्स करताना दिसणार अभिनेत्री सोनिया राठी
रामयुग- खूप मॉडर्न असणार आहे वेब सीरिज- कुणाल कोहली
सिद्धार्थ शुक्ला ‘ब्रोकन बट ब्यूटिफुल ३’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही वेब सीरिज येत्या १५ मे ला रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री सोनिया राठी सिद्धार्थ शुक्लासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सिद्धार्थच्या या वेब सीरिजला रिलीजच्या आधीच सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर ही वेब सीरिज ट्रेंड होताना दिसत आहे. ज्यावरून ही वेब सीरिज जबरदस्त हिट होणार असा अंदाज लावला जात आहे.
सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी सोशल मीडियावर या वेब सीरिजचे काही फोटो शेअर केले आहेत. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, ‘रिलीजच्या आधीच हा शो ट्रेंडिंगमध्ये आहे. प्रेक्षकांकडून एवढा उत्साह आणि प्रोत्साहन या आधी कोणत्याच वेब सीरिजला मिळालेला नाही.’ विरल भयानी यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. ज्यात चाहते सिद्धार्थच्या या वेब सीरिजबाबत खूपच उत्सुक असल्याचं दिसत आहे.
सई ताम्हणकर- क्रिती सेनॉनचा ‘मिमी’ ओटीटीवर होणार रिलीज?
एकता कपूरनं काही दिवसांपूर्वीच या शोबद्दल इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली होती. यात तिनं लिहिलं, ‘माझा आवडता शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.’ यात तिनं शो तिनं व्हिडीओ शेअर केले होते आणि सोबतच अनेक हार्ट इमोजी पोस्ट केले होते.