Home बातम्या व्यवसाय BSNL ग्राहकांना धक्का, अनलिमिटेड कॉलिंग रद्द

BSNL ग्राहकांना धक्का, अनलिमिटेड कॉलिंग रद्द

0

नवी दिल्लीः खासगी कंपनीना टक्कर देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कंपनीने वेगवेगळे प्लान आणले आहेत. परंतु, कंपनीच्या एका निर्णयानं ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. बीएसएनएल ग्राहकांना आता अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार नाही, असे कंपनीने ठरवल्याचे वृत्त ‘टेलीकॉमटॉक’ने दिले आहे.

बीएसएनएलच्या ग्राहकांना आता अनलिमिटेड कॉलिंगऐवजी केवळ २५० मिनिटे कॉलिंग करता येऊ शकणार आहे. हे मिनिट संपल्यानंतर ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. हे नियम काही खास प्लान्सवर लागू असणार आहेत. १८६ रुपये, ४२९ रुपये, ४८५ रुपये, ६६६ रुपये आणि १ हजार ६०० रुपयांच्या प्री-पेड प्लानचा यात समावेश आहे. नव्या नियमांतर्गत ग्राहकांना एक दिवसात केवळ २५० मिनिटे कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. या कॉलिंगमध्ये लोकल, एसटीडी आणि रोमिंगच्या कॉलिंगचा समावेश आहे. २५० मिनिटे संपल्यानंतर ग्राहकांना १ पैसे प्रति सेकंद प्रमाणे पैसे मोजावे लागणार आहेत.