नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प 2019 आज सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनसकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. प्रचंड बहुमताने दुसऱ्यांदा आलेलं मोदी सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगार, कृषी या क्षेत्रातील आव्हानाला सामोरे जात सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतील अशी आशा आहे.
निर्मला सीतारामन यांचे आई-वडीलदेखील अर्थसंकल्प मांडताना असणार उपस्थित
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आई सावित्री सीतारामन आणि वडील नारायन सीतारामन संसदेत पोहचले. निर्मला सीतारामन या मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
10:15 AM
राष्ट्रपतींच्या भेटीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत पोहचल्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर संसदेत पोहचले
- Advertisement -