Home बातम्या वैज्ञानिक Chandrayaan 2 : तोरा मिरवणाऱ्या NASA चे पुणेकराने टोचले कान, पुढे काय झालं ते वाचून वाटेल अभिमान!

Chandrayaan 2 : तोरा मिरवणाऱ्या NASA चे पुणेकराने टोचले कान, पुढे काय झालं ते वाचून वाटेल अभिमान!

अंतराळ विज्ञान आणि संशोधनात चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सोमवार 22 मे रोजी दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावलेल्या जीएसएलव्ही एमके-3 एम-1 या प्रक्षेपकाने यशस्वीरीत्या उड्डाण करून चांद्रयान-2 ला यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवले आहे. त्यानंतर इस्रोने चांद्रयान-2 चे उड्डाण यशस्वी झाले असून, हे यान पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचल्याची घोषणा केली आहे. इस्रोच्या या कामगिरीचे जगप्रख्यात अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासानेही अभिनंदन केले. मात्र, नासाने आपल्या ट्विटरमध्येही स्वत:चीच पाठ थोपविण्याचा प्रयत्न केला होता. 
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने भारतीय अंतराळ संस्था इस्रोचे अभिनंदन केले. मात्र, नासाने या ट्विटमध्येही स्वत:चेच गोडवे गायल्याचं दिसून आलं. त्यानंतर, भारतीय ट्विटर युजर्संने नासाला चांगलेच सुनावले. त्यापैकी, एका पुणेकर ट्विटरच्या ट्विटला नासाने उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे हे ट्विटर अकाऊंट खरे आहे, की नाही हेही अद्याप माहित नाही. पण, नासानेही पुणेकर युवकाची दखल घेत अभिनंदन ट्विटचा खुलासा केला आहे. 

चंद्रयान 2 च्या यशस्वी उड्डाणासाठी इस्रोचे अभिनंदन. आमच्या डीप स्पेस नेटवर्कच्या सहाय्याने या मोहिमेतील कम्युनिकेशनसाठी मदत दिल्याचा आम्हाला गर्व आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरुन आपणास मिळणाऱ्या माहिताची आम्हालाही आशा आणि उत्सुकता आहे. विशेष म्हणजे पुढील काही वर्षात अर्टेमिस मिशनद्वारे आम्हीही तेथे आमचा अंतराळवीर पोहोचेल. नासाच्या या गर्विष्ट आणि स्वताचाच उदोउदो करणाऱ्या ट्विटबद्दल भारतीय ट्विटर्संनी नासाला चांगलेच फैलावर घेतले. त्यापैकी, पुणेकर असलेल्या केतन रामटेक यांनी नासाला रिप्लाय देताना, आपण आमचा कमीपणा दाखवता की अभिनंदन करता असे ट्विट केले होते. विशेष म्हणजे पुणेकराच्या या ट्विटला नासाने उत्तर दिले असून त्यामध्ये इस्रोलाही मेंशन केले आहे. भारतीयांना नासाचे कान टोचल्यानं नासाने पुन्हा रिप्लाय दिला आहे. नासाने 3 तासानंतर दुसरे ट्विट करुन पुन्हा एकदा भारताचे अभिनंदन केले. 
आम्ही नेहमीच अंतराळातील संसोधन मोहिमेला सहकार्य केले आहे. तसेच, या मोहिमेतून मिळालेल्या अनुभवाबद्दल अभिमानही व्यक्त केला आहे. वैश्विक सहकार्य हे आमच्या मार्गदर्शक सिद्धांतांपैकी एक आहे. ब्रम्हांडातील न उलगणाऱ्या प्रश्नांचे उत्तर शोधून मानवाच्या संशोधकीय विस्तारासाठी हे सहकार्य गरजेचं असल्याचं नासाने म्हटलं आहे. नासाच्या मिळालेल्या रिप्लायनंतर पुणेकर ट्विटर युजर केतन रामटेक यांनी आनंद व्यक्त केला आहे. नासाने माझ्या ट्विटरला उत्तर दिले, आज माझा दिवस बनला, असे रिट्विट केतन यांनी केले आहे.