हायलाइट्स:
- पावसाने आपल्या आगमनासोबतत तडाखा देत मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवून दिली आहे.मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आणि मुंबईची तुंबई झाली.
- मात्र मुंबईच्या तुंबईवरून विरोधकांकडून महाविकास आघाडीवर टीकेची झोड देखील उठलेली पाहायला मिळत आहे.
- भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पावसावर कविता करत मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आहे.
चित्रा वाघ यांनी आपली कविता ट्विट केली आहे. मुबईत पाऊस पडल्यानंतर मुंबई पाण्याचे भरली आहे. अशा अवस्थेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र घरी बसले आहेत. अशा परिस्थिती ही जबाबदारी कोणाची असा प्रश्न जनता विचारत असल्याचे चित्रा वाघ यांनी विचारले आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘पावसाच्या येता सरी… मुंबई पाण्याने भरी… मुख्यमंत्री बसले घरी… मुंबईची जनता विचारी… ‘ही’ कुणाची जबाबदारी ?’
दरम्यान मुंबईत आज पहिल्याच पावसात सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता अशा सखल भागात नेहमी प्रमाणेच पावसाचे पाणी साचले. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं होते. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
क्लिक करा आणि वाचा- अडत्याला वीस लाखाचा चुना; व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
संततधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलसेवेलाही मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी भरले होते. काल दिवसभरात दादर ते अंधेरी या पट्ट्यात ३०० मिलीमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद झाली.
क्लिक करा आणि वाचा- केंद्राच्या भाडेकरू कायद्याला शिवसेनेचा विरोध, राज्यात लागू न करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म पालिका नियंत्रण कक्षात जाऊन मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला. हवामान विभागाने ९ ते १५ जून या दरम्यान मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे पुढचे किमान पाच दिवस सतर्कता बाळगावी लागणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसैनिकांचा जल्लोष, फटाकेही फोडले