हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ५७ हजार ६४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५७ हजार ००६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण ९२० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात एकूण ९२० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ८९१ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ५७ हजार ००६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ४१ लाख ६४ हजार ०९८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३२ टक्क्यांवर पोहोचले आहे.
पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ४१ हजार ५९६ इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांचा विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण १ लाख १४ हजार २५४ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ५६ हजार १५३ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ४४ हजार ७१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ५८ हजार ९४४ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४६ हजार ५४१ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींना पत्र लिहिणार: मुख्यमंत्री
या बरोबरच अहमदनगरमध्ये २१ हजार ०४३ इतकी आहे. औरंगाबादमध्ये ११ हजार ५४९, नांदेडमध्ये ही संख्या ६ हजार ४३६ इतकी आहे. जळगावमध्ये १२ हजार ४६५, तसेच तर रायगडमध्ये एकूण ११ हजार ६२३ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ८ हजार ११७, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ५५५ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार १५६ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- देवेंद्र फडणवीसांनी खोटे बोलून मराठा समाजाची फसवणूक केली: नाना पटोले
३८,५२,५०१ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८३ लाख ८४ हजार ५८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८ लाख ८० हजार ५४२ (१७.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८ लाख ५२ हजार ५०१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३२ हजार १७४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
क्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका या ‘एनसीपी स्पॉन्सर्ड’; फडणवीसांचा आरोप