Home ताज्या बातम्या corona in mumbai latest update: मुंबईच्या दैनंदिन करोना रुग्णसंख्येत किंचित घट; पाहा, ताजी स्थिती!

corona in mumbai latest update: मुंबईच्या दैनंदिन करोना रुग्णसंख्येत किंचित घट; पाहा, ताजी स्थिती!

0
corona in mumbai latest update: मुंबईच्या दैनंदिन करोना रुग्णसंख्येत किंचित घट; पाहा, ताजी स्थिती!

मुंबई: मुंबई महापालिका क्षेत्रात आज कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत किंचितशी घट झाली असली तरी मुत्यूंची संख्या तुलनेने किंचित वाढली. गेल्या २४ तासात ५४० नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ६६४ इतकी होती. तर, दिवसभरात ६२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. काल ही संख्या ७४४ इतकी होती. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ९ इतकी होती. (mumbai registered 664 new cases in a day with 744 patients recovered and 9 deaths today)

याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख १ हजार १९५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ५८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०८ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ८५८ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.

क्लिक करा आणि वाचा- शिवसेनेचे ‘शिवसंपर्क अभियान’; उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना ‘हा’ आदेश

मुंबईत आज ३७ हजार ८०२ चाचण्या

मुंबईत आज एकूण ३७ हजार ८०२ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये ११ सक्रिय कंटेनमेंट झोन असून एकूण ६७ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- पक्षाच्या कार्यक्रमांपासून तीन महिने दूर राहणार; प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

२४ तासांत बाधित रुग्ण – ५४०
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ६२८
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०११९५
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ७७१४
रुग्ण दुपटीचा कालावधी- ८५८ दिवस
कोविड वाढीचा दर ( ०१ जून ते ०७ जुलै)- ०.०८ %

क्लिक करा आणि वाचा- जळगावात महामार्गावर भरधाव कारला अपघात; मुंबईचे दोन तरुण ठार

Source link