Home ताज्या बातम्या Corona Virus-कोरोनाविरेधातील लढ्यात जगातील टॉप 10 नेत्यांमध्ये मोदी पहिल्या स्थानावर

Corona Virus-कोरोनाविरेधातील लढ्यात जगातील टॉप 10 नेत्यांमध्ये मोदी पहिल्या स्थानावर

0

कोविड-19 ला नियंत्रित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे प्रयत्न केलं आहेत, त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात बड्या नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या (PM Narendra Modi) स्थानावर आहेत.

अमेरिकेच्या डाटा रिसर्चर मॉर्निंग कन्सल्टने (Morning Consult) अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या परिणामांवर रिसर्च केली. त्यासोबतच त्यांनी कुठल्या देशातील अध्यक्ष कोरोनावर मात करण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत, यावरही रिसर्च केली. या रिसर्चमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना 10 देशांच्या नेत्यांशी करण्यात आली.

10 नेत्यांच्या यादीत मोदी टॉपवर

या दहा देशांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र यांचं नाव या लिस्टमध्ये प्रथम स्थानावर आहे. मॉर्निंग कन्सल्टने 1 जानेवारी 2020 पासून ते 14 एप्रिल 2020 दरम्यान अमेरिका आणि अमेरिकेच्या बाहेरील सर्व माहिती गोळा केली. याच माहितीच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाची लढाई लढणाऱ्या 10 बड्या नेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर (PM Narendra Modi) आहेत.

यादीत कोण कोण?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

मेक्सिकोचे राष्ट्रपति अ‍ॅन्ड्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन

कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो

जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल

ब्राझीलचे अध्यक्ष जेयर बोलसनॉर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन

जापानचे पंतप्रधान शिन्जो आबे

या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आठव्या स्थानावर आहेत. तर चीनचे राष्ट्रपती शिन्जो आबे हे दहाव्या स्थानावर आहेत. तर राष्ट्रपती शी जिनपिंग यांचं नाव या यादीत (PM Narendra Modi) नाही.