Home ताज्या बातम्या Coronavirus:ब्रिटनमध्ये एका 13 वर्षीय मुलाचा कोरोनामुळे मृत्यू

Coronavirus:ब्रिटनमध्ये एका 13 वर्षीय मुलाचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली:ब्रिटनमध्ये एका 13 वर्षीय मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये या मुलाचे वय सर्वात कमी आहे. या 13 वर्षांच्या मुलाची आई आणइ 6 भाऊ-बहिणींनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. यामुळे जेव्हा सोमवारी या ब्रिक्सटनमध्ये राहणाऱ्या इस्माइल मोहम्मद अब्दुलवबचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या आईला त्याचे अंत्यसंस्कार ऑनलाइन पाहावे लागलेइस्माइलच्या अंत्यसंस्कारात त्याच्या काही नातेवाईकांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली. मात्र यादरम्यान त्यांना प्रोटेक्टिव सूट घालायला दिला होता. तसेच 2 मीटर अंतरावर उभे राहण्यास सांगण्यात आले होते.इस्माइलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर त्याची आई आणि सहा भाऊ-बहिणींमधील दोघांमध्ये काही लक्षण आढळले आहेत. यामुळे त्यांनाही घरातच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. ब्रिटेनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे.इस्माईलचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 38,000 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सीरिअर असणारे 60 टक्के रुग्ण हे साठी ओलांडलेले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुळे अनेक तरुणांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.