वाचा: भारतावर करोनाचे महासंकट: जगभरातील भारतीय मदतीसाठी सरसावले
एखाद्या देशाच्या अक्षांश रेषेचा करोना संसर्गावर काही परिणाम होतो का, हे या संशोधनात जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे संशोधन हेइडेलबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थ जर्मनी आणि चायनीज अकादमी ऑफ मेडिकल सायन्सच्यावतीने करण्यात आले. पृथ्वीच्या भूमध्य रेषेपासून एक अक्षांश रेषा वाढल्यानंतर १० लाख लोकसंख्येमागे ४.३ टक्के करोनाबाधितांची प्रकरणे आढळतात.
वाचा: करोनाचा धसका; इस्रायलमधून भारतासह सहा देशात प्रवास करण्यास बंदी
संशोधकांनी सांगितले की, जे देश भूमध्य रेषेच्याजवळ आहेत, त्या ठिकाणी १० लाख लोकसंख्येमागे ३३ टक्के कमी प्रकरणे आढळत आहेत. सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट किरणांमुळे करोनाचे विषाणू मरत असावेत असाही दावा त्यांनी केला. त्यामुळे जगात उन्हाळ्याच्या दिवसात करोनाची कमी प्रकरणे आढळतील. मात्र, उन्हाळ्यात करोना महासाथीचा आजार संपुष्टात येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाचा: भारतातून ‘या’ देशात प्रवेश केल्यास होणार तुरुंगवासाची शिक्षा!
जगभरात करोनाचे १५ कोटीहून अधिक बाधित
जगभरात करोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू आहे. जगभरात करोनाबाधितांची संख्या १५ कोटी २४ लाखांहून अधिक झाली आहे. तर, ३१ लाख ९ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत सर्वाधिक बाधित असून तीन कोटी २४ लाखांहून अधिक करोनाबाधित अमेरिकेत आहेत. अमेरिकेत पाच लाख ७७ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. तर, भारतात एक कोटी ९५ लाखांहून अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, ब्राझीलमध्ये एक कोटी ४७ लाखांहून अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली.