
वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाने जगभरातील अनेक देशांमध्ये पु्न्हा एकदा जोर धरला आहे. करोना विषाणूच्या बदलत्या स्वरुपामुळे संसर्ग अधिकच फैलावत असल्याचे समोर आले आहे. करोनाच्या संसर्गाचे ब्रिटीश, ब्राझील, भारतीय वेरिएंट अधिक संसर्गजन्य असल्याचे म्हटले जाते. अशातच भारतीयांसाठी दिलासा देणारे संशोधन समोर आले आहे. भारतात निर्मिती झालेली कोवॅक्सिन ही लस या वेरिएंटवर प्रभावी असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे.
भारत बायोटेकने निर्मिती केलेल्या कोवॅक्सिन लशीबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि व्हायरोलॉजी संस्थानच्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. ब्राझीलच्या करोना विषाणूत E484K हा म्युटेशन आढळून आला. हा विषाणू अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्येही आढळून आला होता. ICMR द्वारे करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले की, कोवॅक्सिन करोनाचा ब्रिटीश वेरिएंट B.1.1.7 आणि भारतीय वेरिएंट B.1.617 विरुद्धही प्रभावी आहे. कोवॅक्सिन लस करोनाच्या अनेक वेरिएंटविरुद्ध प्रभावी ठरू शकते असेही संशोधनात म्हटले आहे.
वाचा:अमेरिका: १२ ते १५ या वयोगटासाठी लस उपलब्ध होणार? आठवडाभरात निर्णयाची शक्यता
वाचा: फायजरची भारताला ७ कोटी डॉलरची मदत; लशीबाबत सरकारसोबत चर्चा सुरू
Ocugen ही अमेरिकेतील एक बायोफार्मास्युटिकल कंपनी आहे. अमेरिकन बाजारपेठेत कोवॅक्सिन विकसित करण्यात येत आहे. कंपनीचे सह-संस्थापक डॉ. शंकर मुसुनुरी यांनी सांगितले की, कोवॅक्सिनवर आतापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनातही ही लस प्रभावी असल्याचे दिसून आले. करोना महासाथीविरोधातील लढाईत ही लस प्रभावी ठरू शकते. Ocugen बायोफार्मास्युटिकलने अन्न आणि औषध प्रशासनाकडे कोवॅक्सिनच्या लशीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी मागणारा अर्ज दाखल केला आहे.
वाचा: करोनाच्या थैमानातून जगाची सुटका नाहीच? नव्या संशोधनात झाला खुलासा
याआधी अमेरिका सरकारचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि संसर्ग रोग तज्ज्ञ डॉ. फाउची यांनीदेखील कोवॅक्सिन लस ही भारतीय वेरिएंटवर प्रभावी असल्याचे म्हटले होते.
Source link