Home बातम्या आंतरराष्ट्रीय Coronavirus: कोरोना व्हायरसच्या धसक्यामुळे ‘या’ मुस्लीम देशाने आणली Kiss करण्यावर बंदी

Coronavirus: कोरोना व्हायरसच्या धसक्यामुळे ‘या’ मुस्लीम देशाने आणली Kiss करण्यावर बंदी

0

युएईने आपल्या नागरिकांना पारंपारिक अभिवादन किंवा एस्किमो चुंबन न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. युएईच्या आरोग्य मंत्रालयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लोकांना नाकाला नाक टेकवून चुंबन घेण्यास टाळायला सांगितले आहे.

भयानक कोरोना विषाणू टाळण्यासाठी युएईच्या आरोग्य मंत्रालयाने हा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 450 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे आणि आता तो विषाणू चीनच्या वुहान शहरातून अनेक देशांत पोहोचला आहे
कोरोना विषाणू सामान्य फ्लूप्रमाणेच पसरतो, तरीही विषाणूची लागण झाल्यानंतर 2 ते 14 दिवस या आजाराची लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत.
युएईमध्ये, लोक एकमेकांना भेटताना किंवा जाताना पारंपारिक पद्धतीने नाकाला नाक चिटकवून एकमेकांना अभिवादन करतात. अभिवादन करण्यासाठी लोकांनी हात मिळवण्याऐवजी दुरुन हात हलवून अभिवादन करावं.
लोकांनी शिंका येताना नाक आणि तोंड झाकून ठेवावे असा सल्लाही देण्यात आला आहे. सूचनांमध्ये एकमेकांना मिठी मारणे आणि चुंबन घेण्यास देखील मनाई आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचीही आरोग्य आपत्कालीन स्थिती म्हणून घोषित केली आहे. युएईमध्ये कोरोना विषाणूची पाच प्रकरणं समोर आली आहेत. वुहानहून आलेला हे पाच चिनी पर्यटक होते.