हायलाइट्स:
- करोना लसीकरणानंतर ज्येष्ठ नागरिकांचा डेटिंगकडे वाढता कल
- लॉकडाउनमधील एकटेपणामुळे जोडीदाराची जाणवू लागली आवश्यकता
- अमेरिकेतील डेटिंग अॅपवर ज्येष्ठ नागरिकांची संख्या १५ टक्क्यांनी वाढली
मिस लेंज या कॅलिफोर्नियात वास्तव्य करत आहेत. हे दोघेही तीन एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकले. अमेरिकेत ६० वर्षांवरील नागरिकांना करोना लस देण्यात आली आहे. अमेरिकेत लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून परिस्थितीती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे लॉकडाउन आणि कोविडच्या निर्बंधांमध्ये एकटेपणाने जगणाऱ्यांनी पुन्हा विवाह करण्याचा मार्ग अवलंबला आहे.
वाचा: करोना: भारतासाठी अमेरिकेहून येणारी मदत ‘या’ कारणाने उशिराने येणार
अमेरिकेतील डेटिंग साइटवर वृद्धांची संख्या वाढली आहे. जवळपास १५ टक्क्यांनी ही संख्या वाढली आहे. प्राध्यापिका असलेल्या ६४ वर्षीय कॅथरिन पॉनर यांनी आठ एप्रिल रोजी करोना लशीचा दुसरा डोस घेतला. आता दर शनिवारी त्या मास्कचा वापर करत डेटिंगला जात आहेत. या दरम्यान त्या सोशल डिस्टेंसिंगचेही पालन करत आहेत.
वाचा: काय म्हणावं, कर्ज वसूल करण्यासाठी रेस्टोरंटमध्ये हजारो झुरळे फेकली!
कॅथरिन यांनी सांगितले की, या महासाथीच्या आजारामुळे पुन्हा एकदा प्रेमात पडण्याची संधी दिली आहे. ही संधी गमावण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले. कॅलिफोर्नियामध्ये ग्राफिक डिझायनर असलेल्या मिस लेंज यांनी सांगितले की, लॉकडाउनच्या काळात त्या वडिलांसोबत फिलाडेल्फियामध्ये होत्या. त्यांना अल्झायमरच्या आजाराने ग्रासले आहे. वडिलांच्या घरातून पुन्हा स्वत: च्या घरी आल्यानंतर मिस लेंज यांना एकटे राहणे कठीण वाटू लागले. त्यानंतर एका डेटिंग अॅपवर त्यांना एक प्रपोजल आले. त्यानंतर चर्चा केल्यानंतर विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
वाचा: आश्चर्यच ! महिलेने एकाच वेळी ९ बाळांना जन्म दिला
वाचा:अब्जाधीश बिल गेट्स यांचा घटस्फोट; मुलांना मिळणार इतकी संपत्ती
अमेरिकेत राहणा E्या वयोवृद्ध व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर आता त्यांचे प्रेम शोधायला सुरुवात केली आहे. या वडिलांना असे वाटते की लस डोस घेतल्यानंतर ते पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि आता ते प्रेम शोधू शकतात. किंबहुना साथीच्या वेळी घरे बंद राहिल्यामुळे त्यांना एकटेच रहावे लागले.