coronavirus : सावधान! देशात करोनाची तिसरी लाट येणार, शास्त्रज्ञांनी दिला इशारा

coronavirus : सावधान! देशात करोनाची तिसरी लाट येणार, शास्त्रज्ञांनी दिला इशारा
- Advertisement -


नवी दिल्लीः देशात करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या ( coronavirus india update ) पार्श्वभूमीवर सल्लागार शास्त्रज्ञांनी आणखी एक धोक्याचा इशारा दिला आहे. देशात करोनाची तिसारी लाट येणार आणि ती थोपवता येऊ शकणार ( third covid wave ) नाही, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. करोनाच्या नव्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी आता लसी अद्ययावत करणं आवश्यक आहे. तसंच लसीकरण कार्यक्रमाला वेग देणं गरजेचं आहे. देशात करोना संसर्गामुळे रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणात यामुळे अनेक लोकांचा बळी गेला आहे, असं डॉ. के विजय राघवन ( scientific advisor ) यांनी सांगितलं.

ज्या उच्चस्तरावर करोना व्हायरचा प्रादुर्भाव होत आहे ते पाहता करोनाची तिसरी लाटही थोपवता येणार आहे. पण ही तिसरी लाट कधी येईल हे अद्याप स्पष्ट नाही. पण आपल्याला तिसऱ्या लाटेपासून सतर्क राहिलं पाहिजे. लसी अद्ययावत करण्यासाठी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे, असं राघवन म्हणाले.

Nitin Gadkari: मोदींनी करोनायुद्धाची सूत्रं गडकरींच्या हाती सोपवावीत : भाजप नेत्याचं ट्विट चर्चेत

Covid 19: ‘…तर कोविड व्यवस्थापनाची जबाबदारी लष्कराकडे सोपवा’, हायकोर्टानं फटकारलं

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत करोना रुग्णांची संख्या अजूनही कमी होत नाहीए. गेल्या २४ तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक ३७८० जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यानुसार भारतातील करोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या आता २,२६,१८८ इतकी झाली आहे. यादरम्यान ३,८२,३१५ इतके करोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात आता करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ३४८७२२९ इतकी झाली आहे. तर पॉझिव्हिटी रेट २४.८० टक्क्यांवर गेला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी कडक निर्बंध लावले आहेत. तर काही राज्यांमध्ये पूर्ण लॉकडाउन आहे.



Source link

- Advertisement -