Home बातम्या आंतरराष्ट्रीय Coronavirus and Pregnancy करोना हिरावतोय कुटुंबाचा आनंद; ब्राझीलमध्ये ८०० गरोदर महिलांचा मृत्यू

Coronavirus and Pregnancy करोना हिरावतोय कुटुंबाचा आनंद; ब्राझीलमध्ये ८०० गरोदर महिलांचा मृत्यू

0
Coronavirus and Pregnancy  करोना हिरावतोय कुटुंबाचा आनंद; ब्राझीलमध्ये ८०० गरोदर महिलांचा मृत्यू

[ad_1]

हायलाइट्स:

  • ब्राझीलमधील गरोदर महिलांसाठी करोना महासाथीचा आजार काळ ठरला
  • गरोदर आणि प्रसुती झाल्यानंतर जवळपास ८०० महिलांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू
  • करोना काळात महिलांनी गरोदर होण्याचे टाळण्याचे आवाहन

ब्राझिलीया: करोनाच्या संसर्गाशी झुंजत असलेल्या ब्राझीलमधील गरोदर महिलांसाठी हा महासाथीचा आजार काळ ठरला आहे. ब्राझीलमध्ये गरोदर आणि प्रसुती झाल्यानंतर जवळपास ८०० महिलांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. देशातील अधिकाऱ्यांनी कुटुंब नियोजन करण्याचे आवाहन केले असून करोना काळात महिलांनी गरोदर होण्याचे टाळावे असे आवाहन केले आहे.

ब्राझीलच्या एका टास्कफोर्सनुसार, मागील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून ब्राझीलमध्ये करोना महासाथीचे थैमान सुरू झाल्यानंतर आतापर्यंत कमीत कमी ८०३ गरोदर असताना अथवा प्रसुती झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. यातील ४३२ महिलांचा मृत्यू याच वर्षी झाला. ब्राझीलमध्ये या वर्षी करोनाचा आजार धोकादायक स्तरावर पोहचला आहे.

वाचा:‘भारतात करोनामुळे गंभीर परिस्थिती; लष्कराची मदत घ्यावी’

वाचा:
करोनावर मात केलेल्यांना लशीचा एकच डोस पुरेसा? संशोधनात नवा खुलासा
जगभरात करोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू असताना दुसरीकडे गरोदर महिलांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. इतर देशांच्या तुलनेने ब्राझीलमधील परिस्थिती आणखी घातक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. संपूर्ण जगात करोनामुळे झालेल्या गरोदर महिलांच्या मृत्यूंपैकी एकूण ७७ टक्के प्रकरणे ही ब्राझीलमधील आहेत.

वाचा: सिरम इन्स्टिट्यूट ब्रिटनमध्ये लस तयार करणार; २५०० कोटींची गुंतवणूक!

वाचा: करोनाच्या ब्राझील, ब्रिटीश आणि भारतीय वेरिएंटवर ‘ही’ लस प्रभावी!

जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात करोनाबाधितांची संख्या १५ कोटींहून अधिक झाली आहे. तर, तीस लाखांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक करोनाबाधित आणि मृतांची नोंद करण्यात आली आहे.

वाचा: अमेरिका: १२ ते १५ या वयोगटासाठी लस उपलब्ध होणार? आठवडाभरात निर्णयाची शक्यता

दरम्यान, करोनाच्या महासंकटाशी सामना करत असलेल्या भारतासाठी जगभरातून मदतीचा हात पुढे येत आहे. त्याशिवाय करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहिमेही वेगाने सुरू ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. करोनावर प्रभावी लस निर्मिती करणाऱ्या फायजरची आणि भारत सरकारची लशीबाबत चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे भारताला सात कोटी डॉलरची औषधे मदत म्हणून देण्याचे जाहीर केले आहे.

[ad_2]

Source link