Home ताज्या बातम्या Coronavirus In Maharashtra करोना: राज्यात आज ९ हजार १९५ नवे रुग्ण; रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर

Coronavirus In Maharashtra करोना: राज्यात आज ९ हजार १९५ नवे रुग्ण; रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर

0
Coronavirus In Maharashtra करोना: राज्यात आज ९ हजार १९५ नवे रुग्ण; रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर

हायलाइट्स:

  • करोनाच्या दैनंदिन आकडेवारीतील चढ उतार कायम.
  • राज्यात आज २५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • दिवसभरात ९ हजार १९५ नवीन रुग्णांचे निदान.

मुंबई: राज्यातील करोना संसर्गाचा ग्राफ खाली आला असला तरी दैनंदिन आकडेवारीतील चढ उतार कायम आहे. आज बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात ९ हजार १९५ नवीन रुग्णांची भर पडली तर त्याचवेळी ८ हजार ६३४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. ( Coronavirus In Maharashtra Latest Update )

वाचा: विधानसभा अध्यक्षपदाबाबत शरद पवार यांनी व्यक्त केले मत, म्हणाले…

राज्यातील काही जिल्ह्यांत करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत असली तरी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर यासारख्या प्रमुख शहरांत करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे ही दिलासा देणारी बाब आहे. राज्यात नवीन करोना बाधितांची संख्या अपेक्षित प्रमाणात अजून कमी होत नसली तरी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १ लाख १६ हजारांपर्यंत घटली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९६ टक्क्यांच्यावर गेले आहे. होम क्वारंटाइन आणि संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असलेल्या व्यक्तींची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

वाचा: तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; गर्दी नव्हती तरीही…

अशी आहे करोनाची राज्यातील आजची स्थिती:

– राज्यात आज २५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.०१ टक्के एवढा.
– आज राज्यात ९ हजार १९५ नवीन रुग्णांचे निदान.
– दिवसभरात ८ हजार ६३४ रुग्ण बरे होऊन परतले घरी
– आजपर्यंत एकूण ५८,२८,५३५ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६.०१ टक्के एवढे.
– राज्यात सध्या करोनाचे १ लाख १६ हजार ६६७ ॲक्टिव्ह रुग्ण.
– आतापर्यंत ४,१८,७५,२१७ व्यक्तींच्या कोविड चाचण्या.
– एकूण नमुन्यांपैकी ६०,७०,५९९ (१४.५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात ६,१५,२८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये
– ४ हजार ३३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.

वाचा: मोदी मंत्रिमंडळात कुणाची वर्णी?; आता फडणवीस, पंकजा यांची नावे चर्चेत

Source link