हायलाइट्स:
- राज्यात आज १२४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.
- दैनंदिन रुग्णसंख्या मोठी असल्याने चिंता कायम.
- दिवसभरात ८ हजार १७२ नवीन रुग्णांचे निदान.
वाचा: बीड : ३ तालुक्यांत कडक लॉकडाऊनची घोषणा; असे असतील नवे नियम
राज्यात करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येत असताना दुसरीकडे लसीकरणाचा वेगही वाढवण्यात येत आहे. त्यात दुसरी लाट अजून ओसरलेली नसताना तिसऱ्या लाटेचीही शक्यता बळावत चालल्याने सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रुग्णवाढीला ब्रेक लावण्यासाठी टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा काम करत आहेत. मात्र दैनंदिन रुग्णसंख्येत अपेक्षित घट होत नसल्याने चिंता कायम आहे. काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढताना दिसत असल्याने निर्बंध कडक करण्यासाठीही पावले उचलण्यात आली आहेत.
वाचा: PM मोदी-शरद पवार भेटीमागे दडलंय काय?; राष्ट्रवादीने केले स्पष्ट
करोनाची आजची स्थिती:
– राज्यात आज १२४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा.
– आज राज्यात ८,१७२ नवीन रुग्णांचे निदान तर ८,९५० रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– आतापर्यंत एकूण ५९,७४,५९४ करोना बाधित रुग्णांनी करोनावर केली मात.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या (Recovery Rate) ९६.२८ % एवढे.
– आजपर्यंत तपासलेल्या ४,५२,६०,४६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,०५,१९० (१३.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात ५,७७,६१५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४,१५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.
– राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या लाखापर्यंत आली खाली. सध्या १ लाख ४२९ अॅक्टिव्ह रुग्ण.
– पुणे जिल्ह्यात १६ हजार ३३९, ठाणे जिल्ह्यात १५ हजार ७९३ तर मुंबई महापालिका क्षेत्रात १० हजार ६७२ अॅक्टिव्ह रुग्ण.
वाचा:‘भाजप ही वॉशिंग मशीन; या पक्षात डाकूसुद्धा साधू होऊ शकतो’