हायलाइट्स:
- राज्यात आज २०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- २४ तासांत १० हजार ४५८ रुग्णांची करोनावर मात.
- सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख १२ हजार २३१ पर्यंत घटली.
वाचा:दोन डोस घेतलेत त्यांना मुंबईत सवलती?; लोकलबाबत BMCने दिले ‘हे’ उत्तर
राज्यात करोना आकडेवारीमध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि करोनामृत्यू याबाबतची आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून एका टप्प्यावर येऊन स्थिरावली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्यूंच्या प्रमाणात अपेक्षित घट होत नसल्याने आरोग्य विभागापुढील डोकेदुखी कायम असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच निर्बंधांबाबतही राज्य सरकार अत्यंत सावधपणे पावले टाकताना दिसत आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि करोनाची संभाव्य तिसरी लाट हेसुद्धा काळजी वाढवणारे विषय आहेत. करोनाच्या आजच्या आकडेवारीवर नजर मारल्यास संसर्गाच्या विळख्यातील आणखी २०० रुग्ण गेल्या २४ तासांत दगावले आहेत. आतापर्यंत करोनाने राज्यात १,२५,०३४ रुग्णांचा बळी घेतला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजही ९६ टक्क्यांच्या वरच राहिले असून सक्रिय रुग्णसंख्येतही सतत घट होताना दिसत आहे.
वाचा: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा; PM मोदींची उच्चस्तरीय बैठक, म्हणाले…
करोनाची राज्यातील आजची स्थिती
– आज २०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– राज्यातील करोना मृत्यूदर २.०३ % एवढा आहे.
– दिवसभरात ८ हजार ९९२ नवीन रुग्णांचे निदान.
– आज १० हजार ४५८ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– आतापर्यंत एकूण ५९,००,४४० रुग्णांची करोनावर मात.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०८ % एवढे.
– आजपर्यंत करोनाच्या ४,३५,६५,११९ चाचण्या पूर्ण.
– एकूण नमुन्यांपैकी ६१,४०,९६८ (१४.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात ६,२७,२४३ व्यक्ती होमक्वारंटाइन.
– ४,७५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
– राज्यात सध्या १ लाख १२ हजार २३१ ॲक्टिव्ह रुग्ण.
वाचा: राज्यातील सर्व पोटनिवडणुका अखेर स्थगित; आयोगाने दिले ‘हे’ कारण