हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ७ हजार २४२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ११ हजार १२४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण १९० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या १९० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख ७५ हजार ८८८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५९ टक्के एवढे झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- मुंबईत करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट; ‘ही’ चिंता मात्र कायम!
पुणे जिल्ह्यातीस सक्रिय रुग्णांची संख्या किंचित वाढली
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७८ हजार ५६२ इतकी आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १६ हजार १७७ इतका आहे. तर, सांगलीत ही संख्या ७ हजार ८६७ इतकी आहे. त्या खालोखाल साताऱ्यात एकूण ७ हजार ८४७ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. ठाणे जिल्ह्यात ५ हजार ९०४ रुग्ण सक्रिय आहेत. या खालोखाल अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार ६३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
क्लिक करा आणि वाचा- सरकारने बहाणेबाजी बंद करावी; फडणवीस पूरस्थितीवरून बरसले
मुंबईत ५ हजार ४९२ सक्रिय रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सध्या ५ हजार ४९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, रायगडमध्ये ३ हजार २२१, रत्नागिरीत २ हजार १३९, सिंधुदुर्गात १ हजार ९११, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १ हजार ७४६ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९३४ इतकी आहे. यवतमाळमध्ये सक्रिय रुग्ण वाढले असून ६ वरून ही संख्या आज १४० वर पोहोचली आहे.
क्लिक करा आणि वाचा- राणेंच्या मुलांसारखी मुलं कोणच्याही पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांचा निशाणा
नंदूरबारमध्ये फक्त ९ सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ५८३, नांदेडमध्ये ही संख्या ४५६ इतकी आहे. जळगावमध्ये ५६४, तसेच अमरावतीत ही संख्या १९३ इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या नंदूरबार जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ९ वर आली आहे.
४,८७,७०४ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ७५ लाख ५९ हजार ९३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ९० हजार १५६ (१३.२३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ८७ हजार ७०४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार २४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.