coronavirus in maharashtra updates: राज्याला मोठा करोनादिलासा; आज ७,६०३ रुग्णांचे निदान, बरे होणारे रुग्ण दुपटीने अधिक

coronavirus in maharashtra updates: राज्याला मोठा करोनादिलासा; आज ७,६०३ रुग्णांचे निदान, बरे होणारे रुग्ण दुपटीने अधिक
- Advertisement -

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात ७ हजार ६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण १५ हजार २७७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण ५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: आज राज्याला मोठा दिलासा मिळाला असून राज्यातील दैनंदिन करोना बाधितांची संख्येत मोठी घट झाली असून मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. यात आणखी दिलासादायक म्हणजे आज निदान झालेल्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने अधिक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात एकूण ७ हजार ६०३ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज एकूण १५ हजार २७७ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज एकूण ५३ रुग्णांनी प्राण गमावेल आहेत. (maharashtra registered 7603 new cases in a day with 15277 patients recovered and 53 deaths today)

आजच्या ५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख २७ हजार ७५६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१५ टक्के एवढे झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- पटोलेंवर पाळत का ठेवत आहेत, हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी सांगावे: फडणवीस

सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०८ हजार ३४३ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १६ हजार ९२५ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण १६ हजार ४८८ इतके रुग्ण आहेत. त्यानंतर कोल्हापुरात सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. कोल्हापुरात ही संख्या ११ हजार ७९४ इतकी आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्या ११ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगलीत ही संख्या ११ हजार ०७२, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ९०४, रायगडमध्ये ३ हजार ६९२, रत्नागिरीत ३ हजार ४०१, सिंधुदुर्गात ३ हजार २१४, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३५४ इतकी आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या २ हजार २९४ इतकी झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा- मल्लिकार्जुन खरगे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, केला ‘हा’ आरोप

यवतमाळमध्ये फक्त २२ सक्रिय रुग्ण

या बरोबरच, अहमदनगरमध्ये ३ हजार ४५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, औरंगाबादमध्ये ५९२, नांदेडमध्ये ही संख्या ४६६ इतकी आहे. जळगावमध्ये ६४०, तसेच अमरावतीत ही संख्या २५८ इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २२ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- ठाकरे सरकारची वृत्ती रक्तपिपासू; आमदार आशीष शेलार यांची टीका

५,८२,४७६ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ४१ लाख ८६ हजार ४४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१ लाख ६५ हजार ४०२ (१३.९५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८२ हजार ४७६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ४ हजार ६५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Source link

- Advertisement -