हायलाइट्स:
- मुंबईकरांना करोनाबाबत मिळाला मोठा दिलासा.
- अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सहा हजारांपर्यंत आली खाली.
- गेल्या २४ तासांत महापालिका क्षेत्रात ४०२ नवे रुग्ण.
वाचा: आषाढीनिमित्त अजितदादांचं विठ्ठलाला ‘हे’ साकडं; करोना संपेल आणि…
मुंबईतील करोनाचा विळखा सैल झाला आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होऊ लागली आहे. मुंबईत रविवारी ४५४ नवीन रुग्ण आढळले होते. तो आकडा आज ४०२ पर्यंत खाली आला आहे. तर ५७७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले असून मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ६ हजार ३४९ इतकी कमी झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत करोनाने १४ रुग्ण दगावले असून त्यातील ९ रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. १४ मृतांमध्ये ९ पुरुष आणि ५ महिला होत्या. दोन रुग्ण ४० वर्षाखालील, ५ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील तर ७ रुग्ण ६० वर्षांवरील होते.
वाचा: मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांवर आस्मानी संकट, हवामान खात्याकडून पुन्हा रेड अलर्ट
मुंबईत करोना रिकव्हरी रेट सध्या ९७ टक्के इतका आहे तर १२ जुलै ते १८ जुलै या कालावधीत कोविड वाढीचा दर ०.०६ टक्के इतका राहिला आहे. सध्या रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार ३४ दिवसांवर पोहचला आहे. आज मुंबई पालिका क्षेत्रात एकूण २३ हजार ४८१ कोविड चाचण्या घेण्यात आल्या. सध्या चाळी आणि झोपडपट्टी विभागात ६ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर ६२ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.
वाचा: धबधब्याच्या पाण्यात बुडणाऱ्या तीन मित्रांना त्याने वाचविले, पण…
आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती
२४ तासात बाधित रुग्ण – ४०२
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ५७७
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०७१२९
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- ६३४९
रुग्ण दुप्पटीचा कालावधी – १०३४ दिवस
कोविड वाढीचा दर (१२ जुलै ते १८ जुलै)- ०.०६%
वाचा:ठाणे: कळव्यात दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण ठार, दोन जखमी