Coronavirus In Mumbai: मुंबईसाठी मोठी बातमी; आज करोनामुक्त रुग्णांपेक्षा नवे बाधित वाढले

Coronavirus In Mumbai: मुंबईसाठी मोठी बातमी; आज करोनामुक्त रुग्णांपेक्षा नवे बाधित वाढले
- Advertisement -

हायलाइट्स:

  • मुंबईत आज करोना संसर्गाने २७ रुग्ण दगावले.
  • गेल्या २४ तासांत ७८८ नवीन रुग्णांची पडली भर.
  • मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५ हजार ९४७

मुंबई: मुंबईत करोना साथीची आकडेवारी सातत्याने वर खाली होत असून आज नवीन बाधितांच्या तुलनेत करोनातून बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या कमी राहिली. दिवसभरात ७८८ करोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद करण्यात आली तर करोनामुक्त झालेल्या ५११ रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने २७ रुग्ण दगावले असून आतापर्यंत मुंबई पालिका क्षेत्रात १५ हजार १०० रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १५ हजार ९४७ इतकी खाली आली आहे. ( Coronavirus In Mumbai Latest Update )

वाचा:करोना: राज्यात रुग्णसंख्येत सातत्याने घट; ‘ही’ आहे ताजी आकडेवारी

मुंबईत आज करोनाने २७ रुग्ण दगावले. त्यात १५ रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. मृतांमध्ये १९ पुरुषांचा व ८ महिलांचा समावेश आहे. ५ रुग्ण ४० वर्षांखालील, ८ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील तर १४ रुग्ण ६० वर्षांवरील होते. मुंबईत आज नव्याने ७८८ रुग्णांची भर पडली तर त्याहून कमी ५११ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. आतापर्यंत मुंबईत ६ लाख ८० हजार ५२० रुग्णांनी करोनाविरुद्धची लढाई जिंकण्यात यश मिळवले आहे.

वाचा: मान्सूनच्या सलामीलाच मुंबईत रेड अॅलर्ट; पुढचे चार दिवस धोक्याचे

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेले काही दिवस ९५ टक्क्यांवर पोहचले आहे तर २ ते ८ जून या कालावधीत कोविड वाढीचा दर ०.१२ टक्के इतका राहिला आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून आता ५५३ दिवसांवर पोहचला आहे. मुंबईत आज एकूण २९ हजार ८२ जणांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत करोनाचा ग्राफ खाली येत असल्याने कंटेनमेंट झोन आणि सील इमारतींची संख्याही घटली आहे. सध्या झोपडपट्टी विभाग आणि चाळींमध्ये २८ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर ६२ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

वाचा: शरद पवारांच्या घरी पोहचले चार मंत्री; ‘त्या’ महत्त्वाच्या विधेयकावर खलबतं

Source link

- Advertisement -