Home शहरे मुंबई Coronavirus In Mumbai: मोठी बातमी: मुंबईत रिकव्हरी रेट ९० टक्के; आज २,५५४ नवे करोना बाधित

Coronavirus In Mumbai: मोठी बातमी: मुंबईत रिकव्हरी रेट ९० टक्के; आज २,५५४ नवे करोना बाधित

0
Coronavirus In Mumbai: मोठी बातमी: मुंबईत रिकव्हरी रेट ९० टक्के; आज २,५५४ नवे करोना बाधित

[ad_1]

हायलाइट्स:

  • मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी तीन हजाराच्या आत रुग्णसंख्या.
  • आज २५५४ नवीन रुग्णांची भर तर ५२४० रुग्ण करोनामुक्त.
  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहचले ९० टक्क्यांवर.

मुंबई: मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी तीन हजारच्या आत नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत २ हजार ५५४ नवीन करोना बाधितांची भर पडली असून मार्च महिन्याच्या मध्यानंतरची ही एका दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. दरम्यान, मुंबईत सोमवारी २ हजार ६६२ नवीन रुग्णांची नोंद झाली होती. ( Coronavirus In Mumbai Latest Update )

वाचा: आज राज्यात ५१,८८० नव्या करोना रुग्णांचे निदान, मृत्यू ८९१

मुंबई महापालिका क्षेत्रात एप्रिल महिन्यात करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. दैनंदिन रुग्णसंख्येने ११ हजारांपर्यंतचा टप्पा गाठला होता. त्यामुळे रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती उद्भवली होती. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना अन्यत्र हलवावे लागल्याचे प्रकारही घडले होते. ही स्थिती आता वेगाने सुधारू लागली आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

वाचा: राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णसंख्येत घट; आरोग्यमंत्री टोपेंची माहिती

मुंबईत आज करोनाचे २ हजार ५५४ नवीन रुग्ण आढळले तर त्याचवेळी ५ हजार २४० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. मुंबईत आज एकूण २९ हजार ७६ चाचण्या करण्यात आल्या. गेल्या २४ तासांत मुंबईत ६२ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला असून आतापर्यंत १३ हजार ४७० रुग्ण दगावले आहेत. मुंबईत सध्या करोनाचे ५१ हजार ३८० अॅक्टिव्ह रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर गेले आहे. मुंबईत सध्या कोविड वाढीचा दर ०.५८ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी ११६ दिवसांवर गेला आहे. सध्या चाळीमध्ये आणि झोपडपट्टीत ९८ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर ७५३ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन करोना रुग्णसंख्येत घट झाली असल्याची माहिती आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दिली. त्यात मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.

वाचा: करोनाची दुसरी लाट ओसरतेय!; ‘या’ जिल्ह्यात रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर

[ad_2]

Source link