coronavirus in mumbai and thane करोना: मुंबईत २४ तासांत ५५५ नव्या रुग्णांचे निदान; पाहा, मुंबई-ठाण्यातील ताजी स्थिती!

coronavirus in mumbai and thane करोना: मुंबईत २४ तासांत ५५५ नव्या रुग्णांचे निदान; पाहा, मुंबई-ठाण्यातील ताजी स्थिती!
- Advertisement -

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत मुंबईत ५५५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६६६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण १५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.



मुंबई: मुंबई (Corona in Mumbai) महापालिका क्षेत्रात आज रविवारी कालच्या तुलनेत करोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णसंख्येत किंचितशी वाढ झाली असून मुत्यूंची संख्या देखील तुलनेने किंचित वाढली आहे. गेल्या २४ तासात ५५५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ५०४ इतकी होती. तर, दिवसभरात ६६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. काल ही संख्या ७३६ इतकी होती. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या १३ इतकी होती. (mumbai registered 555 new cases in a day with 666 patients recovered and 15 deaths today)

याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख २हजार ३७६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ६२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ९२८ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ८,५३५ नव्या रुग्णांचे निदान, १५६ मृत्यू

मुंबईत आज ३४ हजार ९८० चाचण्या

मुंबईत आज एकूण ३४ हजार ९८० कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये ५ सक्रिय कंटेनमेंट झोन असून एकूण ६८ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- प्रतिबंधात्मक आदेशास १९ जुलैपर्यंत मुदतवाढ; अत्यावश्यक सेवेची दुकानेच राहणार सुरू

आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

२४ तासांत बाधित रुग्ण – ५५५
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ६६६
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०२३७६
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ७३५४
रुग्ण दुपटीचा कालावधी- ९२८ दिवस
कोविड वाढीचा दर ( ०४ जून ते १० जुलै)- ०.०७ %

क्लिक करा आणि वाचा- सर्वच बाजार १५ दिवस बंद करा, अन्यथा…; कुलदीप गायकवाड यांचा इशारा

ठाण्यात आज ९६ नवे रुग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रात रविवारी दिवसभरात एकूण ९६ नवे करोना बाधित रुग्ण आढळले असून १०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज ठाण्यात एकूण २ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच ठाण्यात आतापर्यंत १ लाख ३१ हजार २८८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण २ हजार ३६ इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती ठाणे महानगर पालिकेने दिली आहे.

Source link

- Advertisement -