coronavirus in mumbai latest update: मुंबईत करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट; ‘ही’ चिंता मात्र कायम!

coronavirus in mumbai latest update: मुंबईत करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट; ‘ही’ चिंता मात्र कायम!
- Advertisement -

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत मुंबईत ३४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज मुंबईत एकूण १३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


मुंबई: मुंबईतील दैनंदिन करोना बाधितांच्या रग्णसंख्येत घट झाली असून कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज दिवसभरात एकूण ३४० नव्या रुग्णांचे निदान झाले असून ४०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या मुंबईत ५ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकीकडे नव्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी दुसरीकडे मृतांच्या संख्येत वाढ झाल्याने मुंबईकरांसाठी ही स्थिती काहीशी चिंतेत भर घालणारी आहे.

काल मुंबईत ४०४ नव्या रुग्णांचे निदान झाले होते,तर ३८२ रुग्ण बरे झाले होते. असे असले तरी काल मृतांची संख्या ६ इतकी होती तर त्यात आज वाढ होत ती १३ वर पोहोचली आहे.

क्लिक करा आणि वाचा- सरकारने बहाणेबाजी बंद करावी; फडणवीस पूरस्थितीवरून बरसले

मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ३५ हजार ५०५ जणांना करोना विषाणूची लागण झाली असून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाख १२ हजार १०० इतकी आहे. या बरोबरच बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के इतका झाला आहे. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून तो १ हजार ४०५ दिवसांवर पोहोचला आहे. तसेच आज दिवसभरात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण १५ हजार ८०८ इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

क्लिक करा आणि वाचा- राणेंच्या मुलांसारखी मुलं कोणच्याही पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांचा निशाणा

मुंबईत दिवसभरात झाल्या ३५ हजार ३९३ चाचण्या

मुंबईत आज दिवसभरात एकूण ३५ हजार ३९३ इतक्या करोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ८० लाख ८६ हजार १५२ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के इतका असून २२ जुलै ते २८ जुलै २०२१ या कालावधीत मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.०५ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या ५ असून सक्रिय सीलबंद इमारची ५४ आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ‘हे म्हणजे राज कुंद्राने कोणता चित्रपट पाहावा हे सांगण्यासारखे’; नितेश राणेंची अजित पवारांवर टीका

मुंबईतील संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

२४ तासात बाधित रुग्ण – ३४०
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ४०३
बरे झालेले एकूण रुग्ण – ७१२१००
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- ५२०१
दुप्पटीचा दर- १४०५ दिवस
कोविड वाढीचा दर (२२ जुलै ते २८ जुलै)- ०.०६%

Source link

- Advertisement -