हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत ६०८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.
- तर, ७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- तसेच आज दिवसभरात एकूण १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईचा रिकव्हरी रेट आता ९६ टक्के इतका असून रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ७२८ दिवसांवर गेला आहे. मुंबईत आज करोनाच्या २८ हजार २९५ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील झोपडपट्टी विभाग आणि चाळींमध्ये सध्या १२ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर पाच पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ८२ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा- दिलासादायक! राज्यात आज नव्या करोना रुग्णांच्या संख्येत घट; १०,८१२ रुग्ण झाले बरे
मुंबईतील करोनाची आजची स्थिती
२४ तासांत बाधित रुग्ण – ६०८
२४ तासांत बरे झालेले रुग्ण – ७१४
बरे झालेले एकूण रुग्ण – ६९४७९६
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ८४५३
रुग्ण दुप्पटीचा दर- ७२८ दिवस
कोविड वाढीचा दर ( २१ जून ते २७ जून)- ०.०९ %
क्लिक करा आणि वाचा- मुंबईकरांना मोठा दिलासा; ५०% मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज
राज्यालाही मोठा दिलासा
दरम्यान, राज्यात देखील आज दिवसभरात नव्या रुग्णाच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासात एकूण ६ हजार ७२७ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर आज नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे हा मोठा दिलासा आहे. आज एकूण १० हजार ८१२ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात १०१ करोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
क्लिक करा आणि वाचा- करोनाच्या नावाखाली सरकारची सामाजिक आणीबाणी; भाजपचा हल्लाबोल