हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत मुंबईत ६९२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६८० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण २५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ टक्क्यांवरच असून रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ७१६ दिवसांवर गेला आहे. मुंबईत आज करोनाच्या ३८ हजार ०७८ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील झोपडपट्टी विभाग आणि चाळींमध्ये सध्या ११ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर पाच पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ८० इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ९,७७१ नव्या रुग्णांचे निदान, बरे होणारे रुग्ण अधिक
मुंबईतील करोनाची आजची स्थिती
२४ तासांत बाधित रुग्ण – ६९२
२४ तासांत बरे झालेले रुग्ण – ६८०
बरे झालेले एकूण रुग्ण – ६९६१०५
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ८३५१
रुग्ण दुप्पटीचा दर- ७१६ दिवस
कोविड वाढीचा दर ( २३ जून ते २९ जून)- ०.०९ %
क्लिक करा आणि वाचा- शिवसेनेच्या महापौर खडसेंच्या भेटीला; अर्धातास बंद दाराआड चर्चा, शिवसेनेत अस्वस्थता
क्लिक करा आणि वाचा- आता मुस्लिम आरक्षणाची लढाई; वंचित बहुजन आघाडीचा ५ जुलैला विधानभवनवर मोर्चा