हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत मुंबईत ४४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण ८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ३ हजार ६७७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ६४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ९२५ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.
क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ७,२४३ नव्या रुग्णांचे निदान, मृत्यू १९६
मुंबईत आज ३० हजार १०० चाचण्या
मुंबईत आज एकूण ३० हजार १०० कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये ५ सक्रिय कंटेनमेंट झोन असून एकूण ६५ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा- काँग्रेस नेते शरद पवार यांच्या घरी; पटोले अनुपस्थित, राजकीय वर्तुळात चर्चा
आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती
२४ तासांत बाधित रुग्ण – ४४१
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ६००
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०३६७७
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ७९५०
रुग्ण दुपटीचा कालावधी- ९२५ दिवस
कोविड वाढीचा दर (०६ जून ते १२ जुलै)- ०.०७ %
क्लिक करा आणि वाचा- कौरवही त्यांचे, पांडवही त्यांचे…?; विजय वडेट्टीवार यांचा भाजपला टोला