Home बातम्या आंतरराष्ट्रीय Coronavirus India फायजरची भारताला ७ कोटी डॉलरची मदत; लशीबाबत सरकारसोबत चर्चा सुरू

Coronavirus India फायजरची भारताला ७ कोटी डॉलरची मदत; लशीबाबत सरकारसोबत चर्चा सुरू

0
Coronavirus India  फायजरची भारताला ७ कोटी डॉलरची मदत; लशीबाबत सरकारसोबत चर्चा सुरू

[ad_1]

वॉशिंग्टन: करोनाच्या महासंकटाशी सामना करत असलेल्या भारतासाठी जगभरातून मदतीचा हात पुढे येत आहे. त्याशिवाय करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहिमेही वेगाने सुरू ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. करोनावर प्रभावी लस निर्मिती करणाऱ्या फायजरची आणि भारत सरकारची लशीबाबत चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे भारताला सात कोटी डॉलरची औषधे मदत म्हणून देण्याचे जाहीर केले आहे.

फायजरचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला यांनी सोमवारी सांगितले की, कंपनी फायझर-बायोटेक्निक लस भारतात उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरात लवकर मंजुरीसाठी भारत सरकारशी चर्चा करीत आहे. त्याशिवाय अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये असलेल्या वितरण केंद्रांमधून सात कोटी डॉलर डॉलर्सची (सुमारे ५१० कोटी रुपये) औषधे भारतात पाठवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा: करोनाच्या थैमानातून जगाची सुटका नाहीच? नव्या संशोधनात झाला खुलासा

‘फायजर इंडिया’च्या कर्मचार्‍यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये त्यांनी सांगितले की,“आम्ही भारतातील करोना परिस्थितीबाबत अतिशय चिंतेत आहोत. आम्ही सर्वजण या कठीण तुमच्यासोबत असल्याचे त्यांनी म्हटले.

वाचा: भारतावर करोनाचे महासंकट: जगभरातील भारतीय मदतीसाठी सरसावले

बोर्ला यांनी म्हटले की, “आम्ही या आजाराविरूद्ध भारताच्या लढाईत भागीदार होण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आमच्या कंपनीच्या इतिहासामधील सर्वात मोठ्या मानवतावादी मदतीसाठी आम्ही सातत्याने कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा:चीनमुळे जगाला टेन्शन; अवकाशात पाठवलेल्या रॉकेटवरील नियंत्रण सुटले

सध्या अमेरिका, युरोप आणि आशियामधील वितरण केंद्रातील औषधे अतिशय जलदपणे भारतात पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. भारतातील प्रत्येक शासकीय रुग्णालयातील प्रत्येक गरजू कोविड रुग्णांपर्यंत औषधे पोहचावीत यासाठी ही मदत करत असल्याचे त्यांनी म्हटले. सात कोटी डॉलरपेक्षा अधिक किंमतीची ही औषधे तातडीने उपलब्ध करून दिली जातील. आम्ही सरकार आणि स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

[ad_2]

Source link