आजच्या १९७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५७ लाख ६२ हजार ६६१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्क्यांवर पोहोचले आहे.
क्लिक करा आणि वाचा- भाजप ओबीसी आरक्षणासाठी रान उठवणार; २६ जून रोजी रास्ता रोको आंदोलन
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ७६७ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार ६८७ इतका आहे. तर, पुण्यात एकूण १७ हजार ३६३ इतके रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या १२ हजार ९९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजार ७०४ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ८६२ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ९९९ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘आतासा एक वाझे सापडला, अजून अनेक विभागात अनेक वाझे बाकी’; फडणवीसांचे टीकास्त्र
या बरोबरच अहमदनगरमध्ये ३ हजार ७०८ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १ हजार ५६५, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार ००५ इतकी आहे. जळगावमध्ये १ हजार ०४२, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार ९१२ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ६२७ इतकी आहे, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या मुंबईत आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ९४ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘अनेकजण अनेक रंग दाखवताहेत, ते रंग बघावे लागतात’; मुख्यमंत्र्यांचा टोला
६,३२,४५३ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ०३ लाख ६० हजार ९३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ०७ हजार ४३१ (१४.८८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ३२ हजार ४५३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ४ हजार १६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.