हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ६२१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५९ हजार ५०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण ५६७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात एकूण ५६७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ६६९ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ५९ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ४० लाख ४१ हजार १५८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.०७ टक्क्यांवर आले आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्याही किंचित घटली
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ५६ हजार ८७० इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांचा विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण १ लाख ०८ हजार ९१५ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ५९ हजार ९७० इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ४७ हजार ४९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७० हजार १८६ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५१ हजार १९५ इतकी आहे.