हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत मुंबईत ३५१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण १० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ७ हजार ६५४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ७२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०६ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता १,०६३ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.
क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ६,९१० नव्या रुग्णांचे निदान, १४७ मृत्यू
मुंबईत आज २२ हजार ०१५ चाचण्या
मुंबईत आज एकूण २२ हजार ०१५ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये ७ सक्रिय कंटेनमेंट झोन असून एकूण ५८ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा- अनिल देशमुखांची CBI च्या FIR विरोधातील याचिका; कोर्टाचा गुरुवारी फैसला
आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती
२४ तासांत बाधित रुग्ण – ३५१
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ५२५
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०७६५४
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- ६१६१
रुग्ण दुपटीचा कालावधी- १०६३ दिवस
कोविड वाढीचा दर (१३ जून ते १९ जुलै)- ०.०६ %
क्लिक करा आणि वाचा- एएएचएलचे मुख्यालय गुजरातमध्ये हलवणार का?; अदानी समूहाने केला ‘हा’ खुलासा