NSG च्या सोशल मीडिया अकाउंटवरून माहिती देण्यात आली. बीरेंद्र कुमार यांनी १९९३ मध्ये बीएसएफ जॉइन केली होती. ५३ वर्षांचे बीरेंद्र हे बिहारचे रहिवासी होते. बीएसएफमधून २०१८ मध्ये ते प्रतिनियुक्तीवर NSG मध्ये सहभागी झाली. आतापर्यंत NSG मध्ये करोना संसर्गाचे ४३० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ५९ जणांवर उपचार सुरू आहे.
देशभरात लॉकडाउन लागेल का? केंद्र सरकारने दिले उत्तर
maharashtra covid 19 variant : महाराष्ट्रातील करोनाच्या व्हेरियंटने तेलंगण, आंध्रात थैमान; ५०
दिल्लीतील स्थिती गंभीर
राजधानी दिल्लीत मंगळवारी करोनाचे १९,९५३ नवीन रुग्ण आढळून आले. तिथे आता जवळपास ९२ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजूबाजूची शहरं नोएडा आणि गुरुग्राममध्येही करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटल्सचे बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे मृतांची संख्या वाढत आहे.