Home बातम्या आंतरराष्ट्रीय Coronavirus travel ban करोनाचा धसका: भारतातून येणाऱ्यांना अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाची प्रवेश बंदी

Coronavirus travel ban करोनाचा धसका: भारतातून येणाऱ्यांना अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाची प्रवेश बंदी

0
Coronavirus travel ban करोनाचा धसका: भारतातून येणाऱ्यांना अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाची प्रवेश बंदी

[ad_1]

वाॉशिंग्टन/कॅनबरा: जगभरातील काही देशांमध्ये करोना संसर्गाचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. भारतातील करोना परिस्थितीवर इतर देशांचे लक्ष आहे. भारतातून करोनाचा आपल्या देशात येऊ नये यासाठी काही देशांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने भारतात वास्तव्य केलेल्या बिगर अमेरिकन प्रवाशांना प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तर, ऑस्ट्रेलियाने प्रवेश बंदीचा नियम मोडल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी याबाबतचा निर्णय जाहीर केला. मागील १४ दिवसांपासून भारतात राहिलेल्या आणि अमेरिकेचे नागरिक नसलेल्या नागरिकांच्या अमेरिका प्रवेशावर बंदी जाहीर केली आहे. मंगळवार, ४ मेपासून ही बंदी पुढील अनिश्चित काळासाठी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेने आपले नागरिक, ग्रीन कार्डधारक, त्यांचे अमेरिकन जोडीदार, तसेच २१ वर्षांहून कमी वयाच्या मुलांसह विभिन्न वर्गांतील नागरिकांना या बंदीतून सवलत दिली आहे. यात विशिष्ट शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि पत्रकार, तसेच काही नागरिकांनादेखील ही सवलत दिली आहे. हा निर्णय अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाने रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र यांच्या सल्ल्याने घेतला आहे.

वाचा:करोनाचे थैमान: WHO कडून आणखी एका लशीला मंजुरी

वाचा:करोनाचा हाहा:कार: भारत-नेपाळ सीमेवरील २२ ठिकाणी एन्ट्री पॉईंट बंद

आदेश न पाळल्यास कारावास

ऑस्ट्रेलियानेही मागील १४ दिवसांपासून भारतात असलेल्या आपल्या नागरिकांना देशात परतण्यावर अनिश्चित बंदी लागू केली आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास किंवा मोठ्या रकमेचा दंड भरावा लागेल, असा इशाराही दिला आहे. ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी सांगितले की, भारतात संसर्ग बाधित होऊन ऑस्ट्रेलियात परतलेल्या अनेक नागरिकांना सध्या विलगीकरणात राहावे लागत आहे. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियात संसर्ग नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने हा आदेश दिल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वाचा: भारतात करोनाचे थैमान; ‘या’ कारणांमुळे जगाला सतावतेय चिंता

वाचा: ‘या’ देशात करोनाचे मृत्यू तांडव; एकाच महिन्यात एक लाख जणांनी गमावले प्राण

आयर्लंडमध्ये विलगीकरण बंधनकारक

आयर्लंड सरकारने भारतात आलेल्या प्रवाशांना हॉटेलमध्ये विलगीकरण बंधनकारक केले आहे. विलगीकरण बंधनकारक केलेल्या देशांमध्ये भारतासह अन्य पाच देशांचा समावेश असून मंगळवारपासून हे आदेश लागू असतील, असेही स्पष्ट केले आहे. भारताशिवाय जॉर्जिया, इराण, मंगोलिया आणि कोस्टारिका या देशातून येणाऱ्या प्रवाशांना ४ मेपासून विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल. शुक्रवारी सरकारने जाहीर केलेल्या आदेशानुसार, विशिष्ट देशांतून आयर्लंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये विलगीकरणात राहावे लागेल, त्यासाठी प्रवासापूर्वीच बुकिंग करणे आवश्यक असेल. त्याची बिलेही भरणे आवश्यक आहे. तसे न करणे गुन्हा मानला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link