Home ताज्या बातम्या Covid-19 Lockdown : 15 जूनपासून संपुर्ण देशात पुन्हा कडक ‘लॉकडाऊन’ ? मोदी सरकारनं केला खुलासा

Covid-19 Lockdown : 15 जूनपासून संपुर्ण देशात पुन्हा कडक ‘लॉकडाऊन’ ? मोदी सरकारनं केला खुलासा

नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या दरम्यान काही अफवा देखील पसरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून एक मॅसेज व्हायरल होत आहे की 15 जूनपासून भारतात पुन्हा लॉकडाऊन सुरु होईल. या बनावट मॅसेजमुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. बरेच लोक ज्यांनी आपल्या घरी येण्यासाठी किंवा जाण्यासाठी तिकिट बुक केले आहेत ते देखील चिंतेत आहेत. एका वृत्तवाहिनीचे नाव वापरून बनावट बातम्या पसरविण्यात येत आहेत- ’15 जूननंतर पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन सुरु होऊ शकेल. गृह मंत्रालयाने दिले संकेत, रेल्वे आणि हवाई प्रवासावर लागेल ब्रेक, कोरोनाचा वाढत्या प्रभावामुळे घेण्यात येईल निर्णय.’ अशा पद्धतीचा बनावट मॅसेज व्हायरल होत आहे.

मात्र प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्टचेक युनिटने या मॅसेजला बनावट म्हणून संबोधले आहे. पीआयबीने ट्वीट करून म्हटले आहे की- ‘सोशल मीडियावर पसरलेल्या फोटोत असा दावा केला जात आहे की गृह मंत्रालयाने रेल्वे आणि हवाई प्रवासावर बंदी घालण्यासोबतच 15 जूनपासून पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लागू केले जाऊ शकते. हे बनावट आहे. बनावट बातम्या पसरविणार्‍या अशा फोटोंपासून सावध रहावे.’आता प्रश्न हा आहे की, 15 जूनला पुन्हा लॉकडाऊनचा दावा का केला जात होता ? याचे कारण फक्त ही बनावट बातमीच होती. लोकांनी हा मॅसेज पाहिला आणि ताबडतोब गुगलवर जाऊन शोध घेतला. लोकांना यासंदर्भात काहीही अधिकृत माहिती मिळाली नाही, परंतु या बनावट संदेशावर एक टीव्ही चॅनेलचे चिन्ह पाहून लोकांना विश्वास बसला. यापूर्वी आपण गुगलवर भारताशी संबंधित डेटा पाहिल्यास आपल्याला आढळेल की 15 जूनच्या लॉकडाऊनशी संबंधित प्रश्नांना सर्च केले गेले आहे. यापूर्वी लॉकडाऊनवरील निर्बंध हळूहळू टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी भारत सरकारने प्लॅन अनलॉक इंडिया लागू केला आहे.