Home ताज्या बातम्या covid -19:40 कोरोना बळींची माहिती लपवली, सोलापुरातील तीन रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस

covid -19:40 कोरोना बळींची माहिती लपवली, सोलापुरातील तीन रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस

सोलापूर : सोलापुरातून एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सोलापुरातील तब्बल 40 कोरोनाबाधित मृतांचा आकडा तीन रुग्णालयांनी महापालिका यंत्रणेकडे पाठवला नाही. जून आणि मे महिन्यात मृत झालेल्या 40 लोकांची यादी आज (22 जून) पालिकेला प्राप्त झाली.कम्युनिकेशन गॅपमुळे मृतांचा आकडा पालिकेपर्यंत पोहोचला नाही, अशी माहिती आहे. महानगर पालिकेच्या यंत्रणेत 40 कोरोनाबाधित मृतांची आज अखेर नोंद करण्यात आली. त्यामुळे सोलापुरातील कोरोना बळींची संख्या 213 वर पोहोचली आहे.कोरोना बळींची माहिती दडविल्याप्रकरणी सिव्हील हॉस्पिटल, अश्विनी रुग्णालय, मार्कंडेय रुग्णालयाला पालिका आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, ज्या डॉक्टरांकडे या तीन रुग्णालयांची जबाबदारी होती, त्यांच्यावरही पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.