हायलाइट्स:
- २४ तासांत ३ लाख ६८ हजार १४७ करोनाबाधित रुग्ण आढळले
- एका दिवसात ३ लाख ०० हजार ७३२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज
- तर याच दिवशी १२ लाख १० हजार ३४७ जणांना लसीचा डोस
याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ९९ लाख २५ हजार ६०४ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख १८ हजार ९५९ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ६२ लाख ९३ हजार ००३ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत.
देशात सध्या ३४ लाख १३ हजार ६४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ९९ लाख २५ हजार ६०४
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ६२ लाख ९३ हजार ००३
- उपचार सुरू : ३४ लाख १३ हजार ६४२
- एकूण मृत्यू : २ लाख १८ हजार ९५९
- करोना लसीचे डोस दिले गेले : १५ कोटी ७१ लाख ९८ हजार २०७
देशात लसीकरण मोहीमही सुरू आहे. गेल्या २४ तासांत १२ लाख १० हजार ३४७ जणांना लसीचा डोस देण्यात आलाय.
अधिक वाचा :विधानसभा निवडणूक २०२१ : कोण जिंकलं? कोण पराभूत? चर्चित चेहरे