Home गुन्हा Crime:पाबळला विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

Crime:पाबळला विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

शिक्रापूर- पाबळ (ता. शिरूर) येथील फुटाणवाडीमध्ये अल्पवयीन युवतीचा विनयभंग करून तिचे फोटो काढले. त्यांनतर तिला लग्नाची मागणी घालून तिची बदनामी केल्याप्रकरणी एका युवकावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. विनोद सुरेश बगाटे (रा. फुटाणवाडी, पाबळ, ता. शिरूर) याच्याविरुद्ध विनयभंग व इतर गुन्हे दाखल केले आहेत.फुटाणवाडी येथे पीडित युवती काही दिवसांपूर्वी घरात असताना विनोद बगाटे हा युवक घरात आला. त्याने युवतीशी अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग करीत तिचे काही फोटो काढले. त्यांनतर त्याने युवतीला लग्नाची मागणी घालत नकार दिल्यास औषध पिऊन आत्महत्या करेल, अशी धमकी दिली. याबाबत युवतीने तिच्या आई वडिलांना सांगितले असता आई वडिलांनी काही व्यक्‍तींना बोलावून माहिती दिली. त्यावेळी बगाटे याने माफी मागितली होती.युवतीच्या लग्नासाठी काही ठिकाणचे स्थळ येऊ लागले होते. बगाटे याला ही माहिती मिळाल्यानंतर त्याने मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला भेटून प्रेमसंबंधाचे फोटो दाखवत बदनामी केली. पीडितेच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके करीत आहेत.