वृषभ – आजचा दिवस कुटुंबातील सदस्यांसोबत सुखात जाईल. नशिबाची साथ लाभेल व दुपारपर्यंत आनंदाची बातमी मिळेल. आपल्या आरोग्याप्रति सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच काळापासून तुम्ही ज्यांची वाट पाहत आहात अश्या पाहुण्यांचे संध्याकाळी आगमन झाल्याने आनंदी व्हाल. रात्री एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याने तुमच्या सन्मानात वाढ होईल. ६२% नशीबाची साथ राहील.
मिथुन – वडिलांचे आशीर्वाद तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची कृपा यामुळे एखादी बहुमुल्य वस्तू किंवा संपत्ती मिळवण्याची तुमची इच्छा आज पूर्ण होईल. आज कामात व्यस्त राहाल. अनावश्यक खर्च करणे टाळा. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत वाहन चालवताना सावधानता बाळगा. प्रिय तसेच महान व्यक्तींशी भेट घडून आल्याने मनोबल वाढेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल त्यामुळे एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. ६६% नशीबाची साथ राहील.
कर्क – उत्तम स्थितीतील राशीचा स्वामी तसेच गुरू ग्रहाचे आठव्या स्थानी परिभ्रमण यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होऊन कोशवृद्धी होऊ शकते. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. राज्य,मानसन्मान व प्रतिष्ठेत वाढ होईल. घाईगडबडीत व भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे पुढे जाऊन पश्चाताप होऊ शकतो. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत देवदर्शनाचा योग आहे. ६१% नशीबाची साथ राहील.
बुध ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश या पाच राशींसाठी ठरणार लाभदायक
सिंह – राजकीय क्षेत्रात अपेक्षित यशप्राप्ती होईल. अपत्यांच्या जबाबदारीतून मुक्त व्हाल. प्रतिस्पर्धेच्या क्षेत्रात प्रगती कराल. अडलेली कामे पूर्ण होतील. पचनक्रिया मंदावेल तसेच नेत्रविकार होण्याचीही शक्यता आहे. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा काळ प्रियजनांच्या भेटीगाठी व हसण्याखेळण्यात जाईल. खानपानावर विशेष लक्ष्य द्या. ६३% नशीबाची साथ राहील.
कन्या – राशीचा स्वामी बुध ग्रह आज नवम त्रिकोण स्थानी संचार करत आहे. त्यामुळे वृद्ध व्यक्तींची सेवा तसेच पुण्यकार्य यावर खर्च झाल्याने मन आनंदी होईल. विरोधकांसाठी तुम्ही त्रासदायक ठराल. दांपत्य जीवनात सुखद वातावरण राहील. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा काळ प्रियजनांच्या भेटीगाठी व हसण्याखेळण्यात जाईल. खानपानावर विशेष लक्ष्य द्या. ६३% नशीबाची साथ राहील.
तूळ – आज शैक्षणिक तसेच स्पर्धा क्षेत्रात विशेष संधी मिळण्याचा योग आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील. तुमची बोलण्याची पद्धत तुम्हाला विशेष सन्मान प्राप्त करून देईल. अधिक धावपळीमुळे वातावरणाचा विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो त्यामुळे सतर्कता बाळगा. जोडीदाराचे सान्निध्य व सहकार्य पुरेश्या प्रमाणात लाभेल. प्रवासाची स्थिती सुखद व लाभदायक ठरेल. ७७% नशीबाची साथ राहील.
मासिक आर्थिक राशीभविष्य मे २०२१ : या राशींना मिळेल आर्थिक लाभ तर यांना करावा लागेल सांभाळून खर्च
वृश्चिक – आज तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल.धन,सन्मान,यश,कीर्ती यांत वाढ होईल. अडलेली कामे पूर्ण होतील. प्रियजनांशी भेट घडून येईल. आपल्या वाणीवर संयम न ठेवल्यास विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागेल. संध्याकाळी प्रियजनांशी भेट घडून आल्याने मन प्रसन्न राहील. तसेच रात्री बाहेर फेरफटका मारण्याची व मौजमजा करण्याची संधीही मिळेल. ७०% नशीबाची साथ राहील.
धनू – आज घरगुती वापराच्या वस्तूंवर खर्च होईल. संसारिक सुखोभोगाच्या साधनांमध्ये वाढ होईल. कनिष्ठ कर्मचारी किंवा एखाद्या नातेवाईकामुळे तणाव वाढू शकतो. देवाणघेवाण करताना सतर्कता बाळगा कारण पैसे अडकण्याची शक्यता आहे. दिवसा राज्य,कोर्टकचेरीमध्ये धावपळ करावी लागू शकते. परंतु त्यातून तुम्हाला यशप्राप्ती होईल. इतर लोकं आज तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. ५६% नशीबाची साथ राहील.
मकर – आज व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला अनुकूल लाभ मिळाल्याने मन आनंदी होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक सुधारेल. व्यवसाय बदलीची योजना बनत आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. संध्याकाळी धार्मिक स्थानी प्रवासाला जाण्याची योजना बनून मग स्थगित होईल. वाहन चालवताना सावधानता बाळगा कारण अचानकपणे वाहनात बिघाड झाल्याने खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. ७२% नशीबाची साथ राहील.
कुंभ – राशीचा स्वामी शनि ग्रह दुसऱ्या स्थानी असल्याने पत्नीला अचानक शारीरिक त्रास संभवतो त्यामुळे आज धावपळ व अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. संपत्तीच्या खरेदीविक्री व्यवहारापूर्वी सर्व माहिती मिळवून गंभीरपणे विचार करून निर्णय घ्या. संध्याकाळी पत्नीच्या आरोग्यात सुधारणा होईल. परंतु तब्येत पूर्णपणे बरी होण्यासाठी वेळ लागेल. ५३% नशीबाची साथ राहील.
मीन – वैवाहिक जीवन आनंदात जाईल. आज एखाद्या कारणास्तव जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाचा योग बनतो आहे. व्यवसायात होणाऱ्या प्रगतीमुळे अत्यंत आनंदी राहाल. विद्यार्थ्यांची मानसिक तसेच बौद्धिक भारातून सुटका होईल. संध्याकाळी बाहेर फिरत असताना काही महत्वाची माहिती मिळू शकते. आज डोके शांत राहील. आईवडिलांचा सल्ला व आशीर्वाद उपयुक्त ठरेल. ५५% नशीबाची साथ राहील.
– आचार्य कृष्णदत्त शर्मा.
साप्ताहिक राशीभविष्य ०२ ते ०८ मे २०२१ : मे महिन्याचा पहिला आठवडा कसा असेल जाणून घ्या