Home मनोरंजन Dilip Kumar Live- Dilip Kumar Live- दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Dilip Kumar Live- Dilip Kumar Live- दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

0
Dilip Kumar Live- Dilip Kumar Live- दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

[ad_1]

हायलाइट्स:

  • ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन
  • दिलीप कुमार यांचे पार्थीव त्यांच्या निवासस्थानी नेले
  • आज संध्याकाळी सांताक्रुझ येथील कब्रस्तानात होणार अंत्यविधी

मुंबई : Live Updates हिंदी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे बुधवारी सकाळी ७.३० वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या पश्चात पत्नी सायरा बानो आहेत. दिलीप कुमार यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी मनोरंजन सृष्टीमध्ये स्वतःचे असे अढळ स्थान निर्माण केले होते. देवदास, मुगल-ए- आझम यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलेले दिलीप कुमार अनेकांसाठी आदर्श होते.

दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ उतार होत होते. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. करावे लागत होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं. परंतू काही दिवसांननी पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने इस्पितळात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु यावेळी त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

दिलीप कुमार यांचे पार्थिव अॅम्ब्युलन्समधून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले आहे. आज संध्याकाळी ५ च्या सुमारास सांताक्रुझ येथील जुहू स्मशानभूमीत दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. घरून त्यांचं पार्थिव थेट स्मशानभूमीत नेण्यात येईल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच दिलीप कुमार यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी पोहोचले. त्यांच्याआधी अनुपम खेरही घरी पोहोचले.


दिग्गज अभिनेता धर्मेंद्रही दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचले. धर्मेंद्र त्याच्या फार्महाऊसवरून थेट खारमधील दिलीप साहेबांच्या घरी पोहोचले. धर्मेंद्र आणि दिलीप कुमार हे फार जवळचे मित्र होते. धर्मेंद्र यांच्या आधी शबाना आझमीही दिलीप कुमारांच्या घरी पोहोचल्या.

धर्मेंद्र

विद्या बालनही पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत दिलीप कुमार यांच्या घरी अंत्यदर्शनाला गेली

विद्या बालन- सिद्धार्थ रॉय कपूर

दिलीप कुमार यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक कलाकार त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. त्यामध्ये शबाना आझमी यांचाही समावेश होता. महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, ‘एक विद्यापीठ गेले. भारतीय सिनेमाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा तेव्हा सर्वप्रथम आणि शेवटी देखील दिलीप कुमार यांचेच नाव असेल. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला हे दुःख पचवण्याची ताकद मिळो ही देवाकडे प्रार्थना.’

दिलीप कुमार यांच्या घराबाहेर रडताना दिसत आहेत चाहते


दिलीप कुमार यांना सात दिवसांपूर्वी हिंदुजा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांना पुन्हा एकदा श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर मंगळवारी आयसीयू वॉर्डात त्यांना हलविण्यात आले. १० दिवसांपूर्वीच ते इस्पितळातून घरी गेले होते. दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांनी मंगळवारी दिलीप साहेबांची तब्येत सुधारत असल्याचे सांगितले होते पण त्यानंतर अचानक बुधवारी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने अनेकांना धक्का बसला.

दिलीप कुमार यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने ६ जून रोजी इस्पितळात दाखल करण्यात आले होते तेव्हा त्यांच्या फुफ्फुसात बायलेटरल प्ल्यूरल इफ्यूजन असल्याचं निदान झालं होतं. यात, फुफ्फुसांच्या सभोवताल पाणी साचते ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. डॉक्टरांनी उपचारांनी फुफ्फुसांजवळ जमा झालेले पाणी काढले होते. त्यानंतर पाच दिवसांनी त्यांना इस्पितळातून घरी सोडण्यात आलं होतं.

दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ मध्ये पेशावारमध्ये झाला होता. दिलीप कुमार यांच्या पाच दशकांच्या सिनेकरिअरमध्ये ६० हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते. १९९८ मध्ये ‘किला’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.



[ad_2]

Source link