अतिरीक्त वेळेच्या दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांना जोरदार आक्रमण केले, पण यावेळी कोणालाही यश मिळाल्याचे पाहायला मिळाले नाही. त्यामुळे सामना पेनेल्टी शूटआऊटपर्यंत गेला. इटलीच्या संघाना या युरोमध्येच पेनेल्टी शूटआऊटमध्ये सामान जिंकला होता. इटलीने यावेळी त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली आणि युरो चषक पटकावला.
euro 2020 final : पेनेल्टी शूटआऊटमध्ये इटलीचा थरारक विजय, युरो चषक पटकावला
लंडन : पेनेल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात अखेर इटलीने ३-२ असा विजय साकारला आणि इंग्लंडला पराभूत करत त्यांनी युरो चषकाला गवसणी घातली. युरो चषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि इटली यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी केली होती. अतिरीक्त वेळेच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. त्यानंतरचा खेळ हा चांगलाच आक्रमक झाला आणि दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले आणि सामना पेनेल्टी शूटआऊटमध्ये गेला.