दुसऱ्या सत्रात इटलीने जोरदार आक्रमण केले, पण त्यांना यश मिळाले ते ६७व्या मिनिटाला. कारण सामन्याच्या ६७ व्या मिनिटाला लिओनार्डो बनुचीने भन्नाट गोल केला आणि संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली. या गोलनंतर इटलीचे मनोबल कमालीचे उंचावले होते. कारण इटलीचा संघ या गोलनंतर चांगलाच आक्रमक खेळत करत होता. इटलीचा संघ हा दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळत करतो, हे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. हीच गोष्ट इटलीने यावेळी करून दाखवली. कारण दुसऱ्या सत्रात ६७ व्या मिनिटाला गोल करून त्यांना सामन्यात बरोबरी केलीच, पण त्याचबरोबर त्यांनी इंग्लंडचे मानसीक खच्चीकरणही केले. कारण हा गोल जर इटलीने केला नसता तर इंग्लंडला ९० मिनिटांच्या खेळात जेतेपद पटकावता आले असते. पण इटलीने ही गोष्ट घडू दिली नाही.
इंग्लंड ५५ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. 55 वर्षांपूर्वी म्हणजे 1966 मध्ये इंग्लंडचा संघ विश्वविजेता ठरला होता. त्यानंतर आतापर्यंत इंग्लिश संघाने कोणतीही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही.