Euro 2020 Semifinal: युरो कप: पेनल्टी शूटआउटचा थरार, स्पेनचा पराभव करत इटली अंतिम फेरीत

Euro 2020 Semifinal: युरो कप: पेनल्टी शूटआउटचा थरार, स्पेनचा पराभव करत इटली अंतिम फेरीत
- Advertisement -

लंडन: युरो कपची फायनल जस जशी जवळ येत आहे तस तसा त्याचा थरार वाढतोय. स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी इटली आणि स्पेन यांच्यात लढत झाली. अतिशय रोमांचक लढतीत इटलीने स्पेनवर विजय मिळून युरो कपच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

वाचा-Video: नेमारचे अफलातून ड्रिबलिंग आणि लुकासचा विजयी गोल

वाचा- Video: मेसीची अफलातून फ्री किक; अर्जेंटीना उपांत्य फेरीत

दोन्ही संघात झालेली लढत जेव्हा १-१ने ड्रॉ झाली तेव्हा सर्व फुटबॉल चाहत्यांचा श्वास रोखला गेला. इटलीकडून ६०व्या मिनिटाला फेडरिका चीसाने तर स्पेनकडून ८०व्या मिनिटाला अल्बीरो मोराटोने गोल केला. ज्या मोराटोने स्पेनला गोल करून बरोबरी करून दिली होती त्याला पेनल्टी शूटआउटमध्ये गोल करता आला नाही आणि स्पेनचा पराभव झाला. त्यानंतर ३० मिनिटाचा अतिरिक्त वेळ देण्यात आला तरी देखील दोन्ही संघांना गोल करता आला नाही आणि कारण आता अंतिम फेरीत कोण जाणार याचा निर्णय पेनल्टी शुटआउटने होणार होता. धोकादायक आणि सर्वोत्तम डिफेंस असलेली तसेच विजयासाठी नेहमीच तयार असलेला इटलीचा संघ स्पेनसाठी डोकेदुखी ठरला आहे. यावेळी देखील तसेच झाले. पेनल्टी शूटआउटमध्ये इटलीने स्पेनचा ४-२ने पराभव केला आणि फायनलमध्ये प्रवेश केला.

वाचा- सामना झाल्यानंतर पाहा मैदानावर काय केले; व्हिडिओ झाला व्हायरल

इटलीने फायनलमध्ये प्रवेश केला आता फायनलमध्ये त्यांची लढत इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये विजय होणाऱ्या संघाशी असेल. इंग्लंडचा संघ १९९६ नंतर प्रथमच युरोच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. घरच्या मैदानावर वेम्बले स्टेडियमववर ते फॉर्ममध्ये असलेल्या डेन्मार्कशी लढतील.

Source link

- Advertisement -