fadnavis criticizes govt: ‘आतासा एक वाझे सापडला, अजून अनेक विभागात अनेक वाझे बाकी’; फडणवीसांचे टीकास्त्र

fadnavis criticizes govt: ‘आतासा एक वाझे सापडला, अजून अनेक विभागात अनेक वाझे बाकी’; फडणवीसांचे टीकास्त्र
- Advertisement -

हायलाइट्स:

  • विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
  • पोलिस विभागात एक वाझे आपल्याला सापडला. वेगवेगळ्या विभागात अनेक वाझे अजून बाकी आहेत- फडणवीस.
  • अनेक वाझेंचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे आणि यामुळेच सरकारने अधिवेशन फक्त दोन दिवसांचे ठेवले आहे- फडणवीस.

मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पोलिस विभागात एक वाझे आपल्याला सापडला. वेगवेगळ्या विभागात अनेक वाझे अजून बाकी आहेत. त्यांचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे आणि यामुळेच सरकारने अधिवेशन फक्त दोन दिवसांचे ठेवले आहे, असे सांगतानाच राज्य सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. (devendra fadnavis criticizes maha vikas aghadi govt)

याला सरकार म्हणता येईल का?, असा सवाल करत फडणवीस यांनी सर्व मंत्री आपापाल्या विभागाचे राजे झाल्याची टीका केली आहे. प्रत्येक विभागात एक वाझे आहे. गेल्या ६० वर्षांच्या काळात इतका भ्रष्टाचार बघितला नाही. कोणत्याही सरकारला एक मुख्यमंत्री असतो. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीही स्वत:ला मुख्यमंत्री समजतो. इतकेच नाही, तर राज्यमंत्रीही स्वत:ला मुख्यमंत्रीच समजतो, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- साईबाबा संस्थान: असं विश्वस्त मंडळ असेल तर… याचिकाकर्ते काळेंनी दिला इशारा

हे सरकार आहे की सर्कस?

महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात एका तासात स्टे दिले जातात आणि दुसऱ्या दिवशी ते रद्दही होतात. तर तिसऱ्या दिवशी पुन्हा निर्णय घेतले जातात असे सांगताना हे सरकार आहे की सर्कस आहे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘अनेकजण अनेक रंग दाखवताहेत, ते रंग बघावे लागतात’; मुख्यमंत्र्यांचा टोला

हे महाराष्ट्र मॉडेल आहे की मृत्यूचे मॉडेल?

करोना संकटाच्या काळात सरकारने चांगले काम केल्याचे मंत्री सांगतात. मात्र तुमचं डोकं ठिकाणावर आहे का, असे त्यांना विचारावेसे वाटते. देशातील सर्वाधिक करोना रुग्ण हे महाराष्ट्रात होते. किड्यामुंग्यांसारखे लोक मेले. हे कुठले मॉडेल आणले आहे?, असा प्रश्न विचारत, हे तर मृत्यूचे मॉडेल आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

क्लिक करा आणि वाचा- करोनाचे नियम पाळूच, पण मूर्तीमात्र उंचच आणू: गणेशोत्सव मंडळांची भूमिका

उत्तर प्रदेशातील गंगा नदीत ५० मृतदेह सापडल्याबरोबर दोन दिवस महाराष्ट्रात बातम्या चालवल्या जातात. बीड जिल्ह्यात २२ मृतदेह कोंबून एका गाडीत त्याची विटंबना केली जाते. याबाबत मात्र काही लोक काहीच बोलत नाहीत, असे सांगताना हेच यांचे मॉडेल आहे असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Source link

- Advertisement -