FIR करायच्या आधी त्यांनी चोराला पकडलं; मराठी अभिनेत्याने मानले मुंबई पोलिसांचे आभार

FIR करायच्या आधी त्यांनी  चोराला पकडलं; मराठी अभिनेत्याने मानले मुंबई पोलिसांचे आभार
- Advertisement -


मुंबई: प्रवासादरम्यान आपली बॅग किंवा एखादी वस्तू चोरीला जाणं हे काय नवीन नाही. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अनेकदा आपल्या वस्तू सापडतात तर कधी सापडतही नाहीत. परंतु असाच एक अनुभव मराठी अभिनेत्यानं सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केला आहे.

‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता संचित चौधरी याला असाच अनुभव आलाय. प्रवासात प्रत्येकाला चांगले व वाईट अनुभव येत असतात. असाच अनुभव त्यानं शेअर केलाय. पोलिसांसोबतचा एक फोटो शेअर करत संचितनं पोस्ट शेअर केली आहे.

‘काल खूप खतरनाक किस्सा झाला… मी नागपूरहून विमानाने मुंबईला आलो. विमानतळावर उतरल्यानंतर रिक्षा केली , बॅग रिक्षात ठेवली आणि सरळ शूटिंग सुरु असलेल्या मढ आयलँडला जायला निघालो. ATM मधून पैसे काढण्यासाठी मी रिक्षा थांबवली. मी पैसे काढण्यासाठी ATMमध्ये गेलो. पैसे काढल्यानंतर पुन्हा रिक्षाकडे परतलो. परंतु ती रिक्षाच गायब होती. मी घाबरलो. ५ मिनिचं माझा विश्वासच बसत नव्हाता, की खरंच रिक्षा नाहीए. आजू बाजूला खूप पळालो. रिक्षा शोधण्याचा प्रयत्न केला. पण रिक्षाचा नंबरही नव्हता’,असं संचितनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


त्यानंतर संचिनं पोलिसांना सांगितलं.तिथं पोलिसांनी जवळपासचे सीसीटीव्ही चेक केले . परंतु त्यात काही रिक्षा दिसून आली नव्हती. त्यानंतर जवळील वर्सोवा पोलिस ठाण्यात FIR नोंदवण्यासाठी सांगितलं. त्यानंतर संचित FIR नोंदवण्यासाठी वर्सोवा पोलिस ठाण्यात गेला. त्याला पोलिस ठाण्याच्या बाहेर तिच रिक्षा दिसली. तो पोलिस ठाण्यात गेला आणि हिच रिक्षा असल्याचं सांगू लागला. त्यानंतर पोलिसांनी संचितला त्याची बॅग दाखवली आणि चोराला पकडलं असल्याचं सांगितलं.

FIR दाखल करण्यापूर्वीच पोलिसांनी चोरीची दखल घेतल्याबद्दल संचितनं मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.





Source link

- Advertisement -