Four Dead In Lift Collapse धक्कादायक! मुंबईत निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट कोसळून चौघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Four Dead In Lift Collapse धक्कादायक! मुंबईत निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट कोसळून चौघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
- Advertisement -

हायलाइट्स:

  • मुंबईतील वरळी येथील हनुमान गल्लीत एका इमारतीची लिफ्ट कोसळून चौघांचा मृत्यू.
  • या अपघातात एकजण गंभीर झाल्याचे वृत्त आहे.
  • बीडीडी चाळ क्रमांक ११८ आणि ११९च्या समोर असलेल्या या इमारतीचे नाव लतित अंबिका असे आहे.

मुंबई: राज्यात पावसाने हाहाकार माजवलेला असताना मुंबईत एक दु:खदायक घटना घडली आहे. मुंबईतील वरळी येथील हनुमान गल्लीत एका इमारतीची लिफ्ट कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एकजण गंभीर झाल्याचे वृत्त आहे. बीडीडी चाळ क्रमांक ११८ आणि ११९च्या समोर असलेल्या या इमारतीचे नाव लतित अंबिका असे आहे. पार्किंगचे बांधकाम सुरू असताना ही लिफ्ट कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. (four dead and one seriously injured in elevator collapse in worli of mumbai)

अविनाश दास (वय ३५ वर्षे), भारत मंडल (वय २७ वर्षे), चिन्मय मंडल (वय ३३ वर्षे) आणि आणखी एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतांमध्ये समावेश आहे. तसेच गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण मंडल (वय ३५ वर्षे असे आहे. जखमी मंडल यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, मात्र मृत्युसंख्या चिंता वाढवणारी

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, ललित अंबिका या इमारतीचे काम सुरू आहे. आज संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही लिफ्ट कोसळली. या लिफ्टमध्ये आणखी ६ जण अडकून पडल्याचे वृत्त आहे. त्यांची सुटका करण्याचे काम सुरू आहे.

क्लिक करा आणि वाचा- महाड दुर्घटना: तळीयेतील रहिवाशांसाठी शरद पवार यांची ‘ही’ महत्वाची सूचना
क्लिक करा आणि वाचा- महाडमध्ये पावसाचा कहर सुरूच; हिरकणीवाडीत दरड कोसळली

Source link

- Advertisement -