Home बातम्या आंतरराष्ट्रीय G-7 meeting जी-७ राष्ट्र समूह बैठक: भारतीय शिष्टमंडळातील दोघांना करोनाची लागण

G-7 meeting जी-७ राष्ट्र समूह बैठक: भारतीय शिष्टमंडळातील दोघांना करोनाची लागण

0
G-7 meeting  जी-७ राष्ट्र समूह बैठक: भारतीय शिष्टमंडळातील दोघांना करोनाची लागण

[ad_1]

हायलाइट्स:

  • लंडन येथे जी-७ राष्ट्र समूहाच्या बैठकीसाठी भारतीय शिष्टमंडळ दाखल
  • भारतीय शिष्टमंडळातील दोघांना करोनाची लागण
  • परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची करोना चाचणी निगेटिव्ह

लंडन: जी-७ राष्ट्र समूहाच्या बैठकीसाठी दाखल झालेल्या भारतीय शिष्टमंडळातील दोघांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर नियोजित कार्यक्रमात बदल करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबतच्या शिष्टमंडळातील दोघांना बाधा झाली आहे. त्यानंतर संपूर्ण भारतीय शिष्टमंडळ आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती ब्रिटन सरकारने दिली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जी-७ राष्ट्र समूहातील सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक लंडन येथे सुरू आहे. येत्या काही महिन्यात मुख्य परिषद पार पडणार आहे. भारत जी-७ राष्ट्र समूहाचा भाग नाही. मात्र, भारतालादेखील या बैठकीसाठी विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटमध्ये म्हटले की, काल सायंकाळी मी करोनाबाधितांच्या संपर्कात आलो असल्याचे समजले. खबरदारीचा उपाय म्हणून अन्य जणांशी चर्चा केल्यानंतर डिजीटल माध्यमातून पुढील कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जी-७’च्या बैठकीतही डिजीटल माध्यमातून सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा: G7 against China चीनच्या दादागिराने हैराण; जी-७’ राष्ट्र समूहाची वज्रमूठ

वाचा: ‘भारतात करोनामुळे गंभीर परिस्थिती; लष्कराची मदत घ्यावी’

वाचा: करोना: भारतासाठी अमेरिकेहून येणारी मदत ‘या’ कारणाने उशिराने येणार

ब्रिटन सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी कोविड प्रोटोकॉलचे सक्तीने पालन केले जात आहे. सर्व सदस्यांची दररोज कोविड चाचणी केली जात आहे. ‘जी-७’च्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान हे सात देश सहभागी झाले आहेत. यंदाच्या परिषदेसाठी भारत, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया या बिगर सदस्य देशांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.

[ad_2]

Source link